Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

Child Care for Women in Uniform: महिला पोलिसांची ही समस्या सोडविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मुख्यालयातील बंद पडलेले ‘पाळणाघर’ सुस्थितीत करून त्याचे ‘चिमणीघर’ असे नामकरण करीत, कर्तव्य बजाविणाऱ्या महिलांना त्यांच्या चिमुकल्या पाल्यांची काळजीतून मुक्त केले आहे.
Child Care for Women in Uniform: ‘Chimnighar’ Back in Action in Nagpur

Child Care for Women in Uniform: ‘Chimnighar’ Back in Action in Nagpur

Sakal

Updated on

नागपूर: आई-वडील दोघेही पोलिसांत तेव्हा चिमुकल्या मुलाला सोडून कसे कर्तव्य बजावणार. ‘ती’ कामावर असताना, तिच लक्षही चिमुकल्याकडे लागलेले असते. अशावेळी चिमुकल्याचा सांभाळ करणे आणि त्यांना माया लावणार कोण? हा प्रश्‍न त्यांच्यासमोर पडतो. या समस्येचे समाधान पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले असून आता या चिमुकल्यांना ‘चिमणीघर’ची माया मिळणार आहे. महिला पोलिसांची ही समस्या सोडविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मुख्यालयातील बंद पडलेले ‘पाळणाघर’ सुस्थितीत करून त्याचे ‘चिमणीघर’ असे नामकरण करीत, कर्तव्य बजाविणाऱ्या महिलांना त्यांच्या चिमुकल्या पाल्यांची काळजीतून मुक्त केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com