esakal | सोने खरेदीकडे नागरिकांची पाठ; भाव घटले तरीही ग्राहक मिळेना; जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

Citizens' back to gold buying

ग्राहकांची सोन्याला मागणी नसल्याने सध्या दरही घटलेले आहे. ही ग्राहकांसाठी सोने खरेदीची ही चांगली संधी आहे. मात्र, ग्राहक अजून दर कमी होतील या भ्रमात असतील तर त्यांचे अंदाज चुकणार असल्याचेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. अधिक महिना संपल्यानंतर सराफा व्यापाऱ्यांकडून सोन्याची खरेदी सुरू होईल.

सोने खरेदीकडे नागरिकांची पाठ; भाव घटले तरीही ग्राहक मिळेना; जाणून घ्या

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : सोन्याच्या किमतीत घसरण झालेली आहे. त्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र, कोरोनाची भीती, पितृपक्ष आणि अधिक मास आल्याने यंदा सणासुदीच्या दिवस लांबल्याने सराफा बाजारात वर्दळ मंदावली आहे. मात्र, नवरात्रीनंतर बाजारात ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी वाढेल अशी अपेक्षी व्यक्त केली जात आहे.

सोने, चांदीमध्ये सतत चढ उतार सुरू आहे. दरम्यान, सोने काही प्रमाणात स्वस्त झाल्याने सराफा बाजारात सोन्याची मागणी किंचित वाढल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सध्या भारतीय बाजारावर पितृपक्ष आणि चार दिवसानंतर अधिक महिना सुरू होत असल्याने बाजारात ग्राहकांची खरेदीकडे पाठ आहे. तसेच टाळेबंदीच्या भीतीने सराफा व्यापाऱ्यांनीही अद्यापही सोन्याची खरेदी केलेली नसल्याने तेही बाजाराचा अंदाज घेत आहेत.

सविस्तर वाचा - सासऱ्याने जावयाची केली दहा लाखांची मदत; मात्र, सासरच्या त्रासाला कंटाळून मुलीने घेतला कठोर निर्णय

ग्राहकांची सोन्याला मागणी नसल्याने सध्या दरही घटलेले आहे. ही ग्राहकांसाठी सोने खरेदीची ही चांगली संधी आहे. मात्र, ग्राहक अजून दर कमी होतील या भ्रमात असतील तर त्यांचे अंदाज चुकणार असल्याचेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. अधिक महिना संपल्यानंतर सराफा व्यापाऱ्यांकडून सोन्याची खरेदी सुरू होईल.

त्यामुळे देशात एकाचवेळी सोने खरेदी वाढेल आणि दरही चढ्या आलेखानुसार वाढतील. दरवर्षी राखीच्या सणापासून बाजारात सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात गर्दी होते. कोरोनाचे सावट, अधिक महिना यामुळे अद्यापही बाजारात ग्राहकी वाढलेली नाही. ५८ हजार रुपये दहा ग्रॅमवर गेलेले सोने ५२ हजाराच्या आतच स्थिरावलेले आहे.

महत्त्वाची बातमी - अत्यंत दुर्दैवी! रिमझिम पावसात खेळण्याचा तिला आवरला नाही मोह आणि घडली हृदयद्रावक घटना

सोन्याची मागणी वाढणार
नवरात्रीनंतर सोन्याच्या खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे. त्यानंतर दसरा, दिवाळी आणि लग्नसराई लक्षात घेता बाजारात ग्राहकांची गर्दी वाढून दागिन्यांच्या मागणीत वाढ होईल. आता शंभर व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न करण्याची परवानगी प्रशासनाने दिलेली आहे. त्यामुळे डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या लग्न समारंभानिमित्त सोन्याची मागणी वाढणार आहे. मागणी लक्षात घेता सोन्याचे दर ७५ हजार रुपये प्रति दहा ग्रॅमवर जाण्याची शक्यता आहे.
- राजेश रोकडे,
संचालक रोकडे ज्वेलर्स

संपादन - नीलेश डाखोरे

loading image