
नागपूर : नागपूर विभागातील शिक्षण खात्यात झालेल्या बोगस नियुक्त्या, नियमबाह्य मान्यता, शालार्थ आयडी घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यांनी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यामुळे अनेक शिक्षण संचालक आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.