esakal | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून नितीन गडकरींचे कौतुक, म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

nitin gadkari

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून नितीन गडकरींचे कौतुक, म्हणाले...

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : कडबी चौक ते पहलवान शाह दर्गा रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (union minister nitin gadkari) यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित केला होता. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (minister ashok chavan) व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी नितीन गडकरींचे भरभरून कौतुक केले. (CM uddhav thackeray praised union minister nitin gadkari in nagpur)

हेही वाचा: नितीन गडकरी मला तुमची मदत हवी आहे - मुख्यमंत्री ठाकरे

मुख्यमंत्री म्हणाले, नितीन गडकरी मी उगाचच आपलं कौतुक करत नाही. मला ते दिवस आठवतात, जेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हा तुम्ही मुंबई आणि पुणे या दोन शहरातील अंतर कमी केलं होतं. स्वप्न प्रत्यक्षात आणणं यासाठी मोठं धाडस लागतं. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर मी करतो किंवा बघतो असं म्हटलं असतं. मात्र, तुम्ही ते करून दाखवलं. आता तीच एक तुमची ओळख तुमच्या कतृत्वातून देशभरात निर्माण करत आहात, असे स्तुती सुमने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उधळले.

दरम्यान, नागपूरचा विकास होणे गरजेचे आहे. आपण विद्यापीठ कॅम्पसपासून ते आरटीओपर्यंत उड्डाणपूल करत आहोत. तसेच वाडी या भागात देखील एक उड्डाण पूल केला जाणार आहे. याचप्रमाणे मध्य, पूर्व, उत्तर आणि दक्षिण नागपूर या विभागाचा देखील विकास होणे गरजेचे आहे. त्यांना चांगल्या गुणवत्तेचं जीवन मिळणं गरजेचं आहे. झोपडपट्टीतील लोकांना मालकी हक्काचे घर देखील देऊ. मी आपल्या विभागातून सेंट्रल रोड फंडातून हे सर्व पैसे मंजूर केले आहेत आणि यापुढेही ते देऊ, असे गडकरी म्हणाले.

loading image
go to top