देशात सर्वात महाग CNG नागपुरात, एकाच दिवसात २० टक्क्यांनी वाढ

Nagpur CNG Rate
Nagpur CNG RateSakal

नागपूर : निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील, अशी चिंता नागरिकांना लागली आहे. पण, नागपुरात सीएनजीचे दर (Nagpur CNG Rate) विक्रमी उंचीवर पोहोचले आहेत. पेट्रोल-डिझेलपेक्षाही सीनएजीच्या किंमती वाढल्या आहेत. देशातील सर्वात महाग सीएनजी नागपुरात मिळतोय.

Nagpur CNG Rate
Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या महागणार? तुमच्या शहरातील आजचे दर जाणून घ्या

नागपुरात प्रतिकिलो सीनएनजीसाठी १२० रुपये किलो मोजावे लागतात. रविवारपर्यंत सीएनजीचे दर १०० रुपयांवर होते. पण, एकाच दिवसात २० टक्के वाढ झाली असून सीएनजीची किंमत १२० रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे सीनएजीवरील वाहनधारकांना फटका बसत आहे.

नागपुरात सीएनजी इतका महाग का? -

नागपुरात सीनएजीचा पुरवठा करणारे तीनच पंप असून ते रोमेट कंपनीचे आहेत. नागपुरात सीएनजीची पाईपलाईन नाही. त्यामुळे सरकारकडून सबसिडी मिळत नाही. गुजरातमधून एलएनजी आणावा लागतो. त्यानंतर नागपुरात सीएनजीमध्ये रुपांतर केलं जातं. त्यानंतर सीएनजी पंपावर आणून विकण्यात येतो. रशिया युक्रेनमधील युद्धामुळे एलएनजीचे दर वाढले आहेत. तसेच गुजरातमधून नागपुरात एलएनजी आणण्याचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे सीएनजीचे दर गगनाला भिडल्याचं बोललं जात आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? -

युक्रेन-रशियामधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पण, आतापर्यंत भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती जैसे थे आहेत. निवडणुकांमुळे सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले नाहीत, असं बोललं जात आहे. पण, आता निवडणुका संपल्या असून लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील, असंही सांगितलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com