
नागपूर : कोळसा कामगारांच्या मेहनतीमुळे आणि कामगार संघटनेच्या भक्कम पाठिंब्यामुळे आज कोल इंडिया एक अब्ज कोळसा उत्पादनाच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत आहे. देशांतर्गत वीजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने यावर्षी एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचे लक्ष्य निर्धारित केले असल्याची माहिती केंद्रीय कोळसामंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिली.