
पेट्रोल पंपावरील फलकाने वाढवली चिंता; ‘५० रुपयांचे पेट्रोल मिळणार नाही’
नागपूर : पेट्रोलच्या (Petrol) किमती दररोज वाढत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. वाढलेल्या किमतीमुळे एक लीटर पेट्रोल भरणे अनेकांना शक्य नाही. त्यामुळे कोणी अर्धा लीटर तर कोणी त्यापेक्षाही कमी पेट्रोल भरीत आहे. परंतु, आता पंपवाल्यांनी ५० रुपयांपेक्षा खाली पेट्रोल विकण्यास नकार दिला आहे. काही पेट्रोल पंप चालकांनी ‘५० रुपयांखाली पेट्रोल मिळणार नाही’ असे फलक लावले आहेत. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. (Petrol of Rs 50 will not be available)
पेट्रोल (Petrol) आणि डिझेल सलग पंधरा दिवसांत ११ रुपयांनी वाढले आहे. शहरात प्रति लीटर पेट्रोल १२०.१४ रुपये तर डिझेल १०२.४९ रुपये झालेले आहे. २२ मार्च रोजी पेट्रोल प्रति लीटर १०९.७१ रुपये तर डिझेल ९२.६८ रुपये होते. १६ दिवसांत १४ वेळा इंधनाच्या दरात वाढ झालेली आहे. त्यामुळे अनेकांचे बजेट बिघडले आहे.
हेही वाचा: INS Vikrant : माजी सैनिकांची सोमय्यांविरोधात पोलिसात तक्रार!
सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडल्याने अनेकांनी गरजेनुसार पेट्रोल टाकायला सुरुवात केली होती. त्यात काही वाहन चालक खिशात पैसे असेल तेवढ्याचे पेट्रोल भरून काम चालवत होते. मात्र, आता तो फंडाही फेल ठरणार आहे. कारण, काही पेट्रोल पंप चालकांनी ‘५० रुपयाच्या खाली पेट्रोल मिळणार नाही’ असे फलकच लावले आहे.
तब्बल १३ वेळा दरवाढ
पंचशील चौकातील पेट्रोल (Petrol) पंपावर फलक दर्शनीय भागात लावल्याने अनेक वाहनचालकांची चिंता वाढली आहे. इंधनाच्या वाढत्या किमती पाहता त्यांनाही ५० रुपयांचे पेट्रोल देणे परवडत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. २२ मार्च रोजी दरवाढीला सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत १३ वेळा दरवाढ झाली आहे.
Web Title: Concerns Raised By Billboards At Petrol Pumps Petrol Of Rs 50 Will Not Be Available Nagpur News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..