
जलालखेडा (जि. नागपूर) : सध्या कोविड-१९ महामारीमुळे (coronavirus) बरेच लोक तणावपूर्ण मनःस्थितीत आहे. त्यात मुख्यत: गरोदर व अशा महिला ज्या बाळाला स्तनपान (Breastfeeding the baby) करतात. त्या या संसर्गाने संक्रमित झाल्या तर बाळाच्या आरोग्याविषयी फार चिंतीत असतात. त्यावेळी त्यांना योग्य माहिती व मार्गदर्शनाची आवश्यकता असते, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण खापेकर (Dr. Praveen Khapekar) यांनी या समस्येवर सखोल मार्गदर्शन केले. स्तनपान करणाऱ्या मातांच्या काही प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. (Confusion about corona among pregnant mothers in rural areas)
आईचे दूध हे बाळासाठी सर्वोत्तम आहार आहे. जो बाळाला संक्रमणापासून वाचवू शकतो. कोविड पॉझिटिव्ह मातेच्या दुधात कोरोनाविरुध्द ॲन्टीबॉडीज तयार होतात. जर आईने बाळाला दूध पाजले तर ॲन्टीबॉडी बाळाला मिळतात. ज्यामुळे बाळाला संसर्गापासून पूर्णपणे वाचवता येत नसले तरी या संसर्गामुळे होणाऱ्या गंभीर श्वासाच्या समस्येपासून वाचवता येते, असे डॉ. खापेकर यांनी सांगितले.
आई पूर्णपणे काळजी घेऊन स्तनपान करते. बाळाला संसर्ग होतो किंवा नाही, या दोन्ही गोष्टींच्या निष्कर्षावरून हे सिध्द झाले की बाळाला संसर्ग होण्याची शक्यता फार कमी असते. जर आपण कुठलाही विचार न करता बाळाला आईपासून १० दिवसांसाठी वेगळे केले तर बऱ्याच वेळा आईला १० दिवसांनंतर दूध येणे बंद होते. त्यामुळे बाळ वरच्या दुधावरच राहतो. ज्यामुळे बाळाला वारंवार जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते. वरच्या दुधाचा खर्च गरीब कुटुंबासाठी न परवडण्यासारखा असतो. वरचे दूध पिणारी मुलं भविष्यात चिडचिडपणा, लठ्ठपणा, रक्तदाब व मधुमेहसारख्या आजारांना बळी पडतात, असेही डॉ. खापेकर म्हणाले.
गरोदर मातेला सौम्य लक्षणे आहेत, तिला श्वसनाची समस्या नाही, तर ती पूर्णतः सावधगिरी बाळगून प्रसूतीनंतर बाळाला स्तनपान करू शकते. जर मातेला सौम्य लक्षणे आहेत, श्वसनास त्रास होत नाही आणि बाळ आईच्या दुधावरच आहे तर अशा परिस्थितीत कुठल्याही गोष्टींचा विचार न करता मातेला बाळाच्या वेगळे करण्याची गरज नाही, असेही डॉ. खापेकर म्हणाले.
बाळाच्या आरोग्यावर प्रभाव पडतो
बरेचदा काही विचार न करता बरेच लोकं मातेला बाळापासून १० दिवसांसाठी वेगळे करून घेतात व बाळाला वरचे दूध पाजणे सुरू करतात. परिणामी १० दिवसांनंतर बाळ आईचे दूध पिण्यास नकार देतो. ज्याचा बाळाच्या भविष्यातील आरोग्यावर प्रभाव पडतो, असे डॉ. खापेकर म्हणाले.
(Confusion about corona among pregnant mothers in rural areas)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.