नागपूर पदवीधर मतदारसंघ : अभिजित वंजारींचा अर्ज दाखल करताना काँग्रेसकडून शक्तीप्रदर्शन, बाळासाहेब थोरातांची उपस्थिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress candidate abhijeet wanjari file nomination for nagpur graduation constituency election

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अहीरकर यांनी विदर्भात काँग्रेस राष्ट्रवादीला दुय्यम स्थान देत असल्याचा आरोप करत आपला उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत बाळासाहेब थोरातांना विचारले असता त्यांनी महाविकासआघाडीत कुठलेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले.

नागपूर पदवीधर मतदारसंघ : अभिजित वंजारींचा अर्ज दाखल करताना काँग्रेसकडून शक्तीप्रदर्शन, बाळासाहेब थोरातांची उपस्थिती

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर - येत्या एक डिसेंबर नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यासाठी काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आज नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवस आहे.  वंजारींचा अर्ज दाखल करताना आज मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीत वंजारींचा अर्ज दाखल करण्यात येणार आहे. 

हेही वाचा - अमेरिकेतील मराठमोळे आमदार ठाणेदार यांनी नागपूरला दिली...

नागपुरात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अभिजित वंजारी यांना उमेदवारी जाहीर तर झाली. मात्र, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अहीरकर यांनी विदर्भात काँग्रेस राष्ट्रवादीला दुय्यम स्थान देत असल्याचा आरोप करत आपला उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत बाळासाहेब थोरातांना विचारले असता त्यांनी महाविकासआघाडीत कुठलेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा - हॉटेल, लॉज मालकांनो रेकॉर्ड अपडेट ठेवा; अन्यथा होणार...

आमच्या सर्वच जागा जिंकून येतील - थोरात
आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत. त्यांचा चांगला कॉन्टॅक्ट आहे. त्यांचे नॉमिनेशन आम्ही आज करत आहोत. महाविकासआघाडीमध्ये कुठलीही नाराजी नाही. आम्ही सर्व मिळून निवडणूक लढवत आहोत आणि आमच्या सर्वच जागा जिंकून येतील, असा विश्वास यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. 

loading image
go to top