
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण होत असताना देश हा सर्वांचा आहे, हे मान्य करून विषारी व विखारी विचार सोडावा. मनुस्मृती व ‘बंच ऑफ थॉट’ला तिलांजली देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार व भारताचे संविधान स्वीकारावे, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.