२०१७ ला भाजप खासदार असताना नाना पटोलेंचा फोन टॅप? वाचा काय म्हणाले नाना...

नाना पटोले
नाना पटोलेe sakal

नागपूर : नाना पटोले हे भाजपचे खासदार असताना २०१७ साली त्यांचा फोन टॅप झाला होता, अशी माहिती समोर आली आहे. अमजद खान नावाने हा फोन टॅप झाला असून त्यांच्यासोबत त्यांच्या चारही सहकाऱ्यांचे देखील फोन टॅप झाल्याचे सांगितले जात आहे. मी यासंबंधी आरोप केला नसून मला देखील फोन टॅप झाल्याची माहिती मिळत आहे. त्याबाबत सरकारने योग्य ती कारवाई करावी. मी भाजपचा खासदार होतो, त्यावेळी राज्यात कोणाचं सरकार होतं? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला होता.

नाना पटोले
तीन तुरुंग अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, कैद्यालाच मागितली एक लाखाची खंडणी

प्रत्येकाला त्यांचं व्यक्तीगत स्वातंत्र्य असते. कोणीही कोणाच्या वैयक्तीक आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाही. सरकारच्या मान्यतेशिवाय कोणाचे फोन टॅप करता येऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये गुजरातसारखे राज्य आणण्याचा प्रयत्न केला जात असून माझा फोन टॅप झाला त्यावेळी राज्यात कोणाचं सरकार होतं? असे नाना म्हणाले.

सरकारने कारवाई करावी - मुनगंटीवार

नाना त्यावेळी भाजपचे अधिकृत खासदार होते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यांची अवहेलना होता कामा नये. एका पक्षाने दुसऱ्याच्या पक्षाच्या नेत्याचे किंवा आपल्याच पक्षाच्या नेत्याचे फोन टॅपिंग करू नये. ताबडतोब निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करून चौकशी करावी. मी नानाभाऊंच्या सोबत आहे. कोणाचाही फोन टॅप होता कामा नये, अश प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com