
नागपूर: ॲड. अभिजित वंजारी यांच्या कार्यालयावर रविवारी समाजकंटकांनी शाई फेकल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसकडून सतरंजीपूरा येथील सुभाष पुतळ्यासमोर निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होते. दरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एकीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते नारेबाजी करत होते, त्यामुळे वाद चिघळू नये म्हणून पोलिसांनी बॅरेकेटींग करत कार्यकर्त्यांना अडवण्यात आल्याने अनर्थ टळला.