नागपूर: कंत्राटदारांच्या देयके थकबाकीचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होऊ लागला आहे. सांगली जिल्ह्यातील एका युवा कंत्राटदाराने यापूर्वी आत्महत्या केली होती. आता नागपूरमधील कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कामाची देयके थकल्यामुळे कर्जही थकले होते. यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. पी. व्ही. वर्मा (६१) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे कंत्राटदार वर्गात प्रचंड खळबळ उडाली असून प्रलंबित बिले मिळत नसल्याने रोष वाढत आहे.