esakal | कोरोनामुक्तीच्या दिशेने नागपूर; प्रथमच शून्य कोरोनाबाधिताची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

 Corona Updates

कोरोनामुक्तीच्या दिशेने नागपूर; १८ महिन्यांनंतर शून्य बाधिताची नोंद

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरू झाल्यानंतर बुधवारी (ता. २९) नागपूर जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित आढळला नाही. तर सद्या शहरात ७० कोरोनाचे रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. विशेष असे की, कोरोनाने नागपुरात ११ मार्च रोजी दस्तक दिल्यानंतर अवघ्या १० ते १५ कोरोना चाचण्या करण्यात येत होत्या. यात एकतरी बाधित आढळून येत होता. मात्र, तब्बल १८ महिन्यांनंतर साडेचार हजार चाचण्यांमध्ये जिल्ह्यात शून्य बाधितांची नोंद झाल्याने जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिले आहेत. यामुळे सारी यंत्रणा कोरोना नियोजनासाठी प्रयत्नशील आहे. चाचण्यांमध्ये बुधवारी नागपूर शहर आणि ग्रामीण भाग कोरोनामुक्त झाला. १६ मे २०२० रोजी शहरात एकही रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, ग्रामीण भागात कोरोनाबाधिताची नोंद झाली होती. तर ग्रामीण भागात बाधित आढळले नव्हते त्यावेळी शहरात बाधितांची संख्या दोन आढळली होती. मात्र, यावेळी शहर आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्ण आढळला नाही. यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे.

हेही वाचा: विषप्राशन करणाऱ्या महिलेला रुग्णालयात नेत असताना युवकाचा मृत्यू

बुधवारी ३ हजार २९८ व ग्रामीणमध्ये १ हजार ०९६ अशा जिल्ह्यात ४ हजार ३९४ चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी शहर आणि ग्रामीण भागातूनही एकही नवा कोरोनाबाधित आढळला नाही. तसेच कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही. दिवसभरात शहरातून ४ ग्रामीणमधून ३ व जिल्ह्याबाहेरील ४ अशा ११ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे शतकाजवळ पोहोचलेला सक्रिय कोरोना बाधितांचा आकडाही खाली आहे. नागपूर शहरात ५८, ग्रामीणमध्ये ११ व जिल्ह्याबाहेरील एक असे केवळ ७० सक्रिय कोरोनाबाधीत जिल्ह्यात आहेत.

२५ सप्टेंबर -१३ जण बाधित

२६ सप्टेंबर -०६ जण बाधित

२७ सप्टेंबर -०९ जण बाधित

२८ सप्टेंबर -१० जण बाधित

आतापर्यंत ४ लाख ९३ हजार २८८ कोरोनाबाधित

आतापर्यंत ४ लाख ८३ हजार ०९८ कोरोनामुक्त

आतापर्यंत १० हजार १२० कोरोनामुळे मृत्यू

loading image
go to top