esakal | चंद्रपुरात कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांच्या नशिबी पाणीही नाही; ऐन उन्हाळ्यात वॉटर ATM झाले बंद

बोलून बातमी शोधा

वॉटर एटीएम
चंद्रपुरात कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांच्या नशिबी पाणीही नाही; ऐन उन्हाळ्यात वॉटर ATM बंद
sakal_logo
By
अथर्व महांकाळ

चंद्रपूर : कोरोनाचं संकट दिवसेंदिवस महाभयंकर रूप धारण करत आहे. त्यात उन्हाळा असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होताहेत. असंच काहीसं चित्र सध्या चंद्रपूरमध्ये बघायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावं लागत आहे.

हेही वाचा: "मजबूर है तो क्या हुआ १५ मिनिट मे बेड इनका होगा"; नागपूरच्या मजुरासाठी सोनू सूदचा मदतीचा हात

नागरिकांना उन्हाळयात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये म्हणून चंद्रपुरात ATM सुरु करण्यात आलं होतं. मात्र अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हात हे वॉटर ATM बंद पडलं आहे. त्यामुळे रुग्णालयात असलेल्या कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांचे मात्र प्रचंड हाल होताहेत.एका पाण्याच्या घुसाठी त्यांना प्रचंड पाऊस खर्च करावे लागताहेत.

हेही वाचा: 'तुम्हाला कार हवे की पैसे?' युवकानं दिलं उत्तर आणि घडला भयंकर प्रकार

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालल्यानं फक्त चंद्रपूर जिल्हाच नाही तर इतरही जिल्ह्यांतून रुग्ण शहरातील रुग्णालयात भरती होण्यासाठी येत आहेत. मात्र त्यांच्या नातेवाईकांना कुठेच आसरा नसल्यामुळे बाहेरच जेवण करून दिवस काढावे लागत आहेत. अशात पारा ४० अंशाच्या पार गेलाय मात्र पाणी न मिळाल्यामुळे नागरिकांचं हाल होताहेत.

संपादन - अथर्व महांकाळ