नागपूर : देशातील सर्वात मोठ्या लोखंडी गर्डरचे लॉचिंग

डॉ. ब्रजेश दीक्षित : सावधगिरीने डबर डेकर गर्डरचे काम करा
country Most of the Large iron Latching of girder
country Most of the Large iron Latching of girder sakal
Updated on

नागपूर : देशातील सर्वात मोठ्या लोखंडी डबल डेकर गर्डरचे लॉचिंग सुरू करण्यात आले आहे. विशालकाय लोखंडी ढाचा तयार करण्यात आला असून क्रेनच्या मदतीने बसविण्यात येत आहे. जोखमीचे हे काम सावधगिरी बाळगत पूर्ण करण्याचे आवाहन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी कामगारांना केले.

country Most of the Large iron Latching of girder
उत्तराखंडमध्ये भाजपला डबल दणका; मंत्र्यासह आमदाराचा राजीनामा?

कामठी मार्गावर गड्डीगोदाम येथे चार मजली पूल तयार करण्यात येत आहे. त्यासाठी विशालकाय लोखंडी ढाचा तयार करण्यात आला. गुरुद्वारा या ठिकाणी लोखंडी ढाचा बसविण्याचे कार्य सुरू झाले. या ठिकाणी आज महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी भेट देत मेट्रो अधिकारी व कामगारांचा उत्साह वाढविला. यावेळी त्यांनी कामगारांशी संवाद साधला. यावेळी महामेट्रोचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. लोखंडी ढाचा बुटीबोरी एमआयडीसी या ठिकाणी तयार करण्यात आला. बुटीबोरी येथून गड्डीगोदामपर्यंत ट्रेलरच्या साहाय्याने हा ढाचा आणला जात आहे. गुरुद्वाराजवळ ५०० टनची २ क्रेन व ३०० टनची १ क्रेन तसेच इतर मशिन दिसून येत आहे. देशात पहिल्यांदाच वेगळ्या पद्धतीची संरचना असलेल्या चार मजली पूलाचे बांधकाम केल्या जात आहे. पहिल्या मजल्यावर जमिनी मार्ग (विद्यमान आरयुबी मार्ग) रहदारी करिता असलेला रस्ता, दुसऱ्या मजल्यावर रेल्वे ट्रॅक, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर उड्डाणपूल आणि मेट्रो ट्रॅक राहणार आहे.

country Most of the Large iron Latching of girder
राज्यात नवे निर्बंध लागू; अनिल परबांची घोषणा

योग्य खबरदारीच्या सूचना

महामेट्रोच्या वतीने कार्य स्थळी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करत मेगाफोनच्या साहायाने सतत सूचना दिल्या जात आहे. भारतीय रेल्वेचे संचालन होत असताना योग्य खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहे. जमिनीपासून २४ मीटर उंचीवर आव्हानात्मक कार्य केल्या जात आहे. या निर्माण कार्यस्थळी सुमारे २०० अधिकारी, कर्मचारी, इंजिनिअर व कामगार चोवीस बाय सात काम करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com