esakal | पोलिसांचा राहिला नाही धाक! .पती-पत्नीने केली पोलिस अधिकाऱ्याला मारहाण; नागपुरातील घटना 
sakal

बोलून बातमी शोधा

couple beat police officer in nagpur

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजीतकुमार जैन याचे लकडगंज पोलिस स्टेशनजवळ कपड्याचे दुकान आहे. त्याच्या घराजवळ एक मंदिर आहे. एक महिला वस्तीतील त्या मंदिराची रंगरंगोटी करीत होती.

पोलिसांचा राहिला नाही धाक! .पती-पत्नीने केली पोलिस अधिकाऱ्याला मारहाण; नागपुरातील घटना 

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः शेजारी राहणाऱ्या महिलेच्या विनयभंगाच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला आरोपीने आणि त्याच्या पत्नीने जबर मारहाण केली. ही घटना दिवाळीच्या दिवशी घडली. या प्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीवर गुन्हा दाखल केला असून पतीला अटक केली आहे. अजीतकुमार सुरेशकुमार जैन (४३, तुलसीनगर) आणि रोशनी जैन (३५) अशी आरोपींची नावे आहेत. 

हेही वाचा - आता दुपारच्या वेळी बिनधास्त झोपा; 'हे' आहेत दुपारी झोपण्याचे फायदे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजीतकुमार जैन याचे लकडगंज पोलिस स्टेशनजवळ कपड्याचे दुकान आहे. त्याच्या घराजवळ एक मंदिर आहे. एक महिला वस्तीतील त्या मंदिराची रंगरंगोटी करीत होती. विकृत मानसिकतेच्या अजीतकुमारने तिची मोबाईलने व्हीडीओ शुटिंग केली तसेच तिचे फोटो काढले. त्यामुळे महिलेने आक्षेप घेत फोटो काढण्यास मनाई केली. 

अजीत कुमार पुन्हा महिलेचे फोटो काढत महिलशी लज्जास्पद वर्तन केले. ती महिला लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये पोहचली. तिने ड्युटी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शिवचरण डोंगरे यांच्याकडे लेखी तक्रार दिली. तसेच पोलिस निरीक्षक पराग पोटे यांची भेट घेऊन हकिकत सांगितली. पोटे यांनी पीएसआय डोंगरे यांना आरोपीला बाजू मांडण्यासाठी पोलिस ठाण्यात बोलविण्यास सांगितले. त्यानुसार पीएसआय डोंगरे यांनी आरोपी अजीतकुमार याला फोन करून पोलिस ठाण्यात बोलावले. 

सविस्तर वाचा - ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिघा भावांचे मृतदेह बघून अख्खे गाव हळहळले; तलावात बुडून झाला मृत्यू

त्याने पोलिसांना फोनवरून शिवीगाळ करून ठाण्यात येण्यास नकार दिला. त्यामुळे पीएसआय डोंगरे हे आरोपीला आणण्यासाठी घरी गेले. त्यावेळी अजीतकुमार आणि त्याची पत्नी रोशनी यांनी पोलिस अधिकाऱ्यावर लाकडी दंड्याने हल्ला केला. अधिकाऱ्याला जबर मारहाण केली. त्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त कर्मचारी बोलावले आणि अजीतकुमारवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image