esakal | लॉकडाउनमधील लग्न न्यायालयाच्या वाटेवर, अनेकांचे घटस्फोटासाठी अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

divorce-couple.jpg

लॉकडाउनमधील लग्न न्यायालयाच्या वाटेवर, अनेकांचे घटस्फोटासाठी अर्ज

sakal_logo
By
केतन पळसकर

नागपूर : दोन जिवांचे मिलन होताना पुरेसा संवाद न होऊ शकल्यास त्याचे परिणाम कसे भोगावे लागू शकतात याचा प्रत्यय लॉकडाउनमध्ये जुळलेल्या लग्नांमधून (marriage in lockdown) येतो आहे. या काळात विवाह बंधनात अडकलेल्या काही जोडप्यांनी घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज (family court nagpur) केल्याची माहिती आहे. (couple those married in lockdown filed for divorce in the family court nagpur)

हेही वाचा: क्लिनिकल ट्रायलचा दुसरा टप्पा बुधवारी; ३५ मुलांचे स्क्रिनिंग

शासनाने लग्न सोहळ्यावर निर्बंध लादल्याने काही कुटुंबांना आयोजन करताना अडचणींचा सामना करावा लागला. तर, कमी खर्चात आणि थोडक्यात लग्नसोहळा आटोपला जाऊ शकतो या बाबीचा विचार करून काहींनी घाई-घाईत लग्नसोहळे उरकले. मात्र, हीच घाई जोडप्यांच्या संसारात व्हिलन बनून उभी ठाकली आहे. लग्न ठरण्याच्या प्रक्रियेत कुटुंबीयांची ओळख, चालीरीती, आवश्‍यक चौकशी अशा काही बाबींचा समावेश होतो. लॉकडाउन काळात लग्न उरकलेल्या अशा काही जोडप्यांना संवाद साधायला संधी आणि पुरेसा वेळ न मिळाल्याने ही प्रकरण थेट न्यायालयापर्यंत गेली आहेत. तसेच, सतत घरी राहून स्वभावामध्ये झालेले बदल, होणारी चिडचिड, आर्थिक समस्या यामुळे देखील प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहोचत आहेत.

काय करायला हवे?

  • भविष्याचा विचार करुन संवाद साधावा

  • जीवनातील प्रत्येक बाजूचा विचार व्हायला हवा

  • महिला भावनिक असल्याने त्यांना कामात प्रोत्साहन द्यावे

  • संवादामध्ये समतोलता असावी

  • आपल्या जोडीदाराच्या मानसिकतेचा विचार करावा

या दरम्यान जोडप्यांचे फक्त फोनवर बोलणे झाल्याने पारदर्शीपणा राहिला नाही. तसेच, एकमेकांमधील क्षमता आणि एकमेकांना ओळखण्यासाठी वेळ देऊ शकले नाही. त्यामुळे, नवविवाहित वधू-वरांमध्ये कटुता निर्माण होते आहे.
- ॲड. अनिल कावरे
लग्न या बाबीला अनेक बाजूंनी पाहिले जाते. प्रत्येक बाबीकडे पुरुष आणि महिला मानसिक दृष्ट्या वेग-वेगळ्या बाजूंनी पाहतात. महिला या भावनिक असतात. संवादामध्ये या समतोल राखणाऱ्या बाबींचा समावेश व्हायला हवा.
-डॉ. प्रवीण नवखरे, मानसोपचार तज्ज्ञ
loading image