नागपुरातील प्रत्येक तालुक्यात लहान मुलांसाठी विशेष कोविड सेंटर; जिल्हा परिषदेचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागपुरातील प्रत्येक तालुक्यात लहान मुलांसाठी विशेष कोविड सेंटर; जिल्हा परिषदेचा निर्णय

नागपुरातील प्रत्येक तालुक्यात लहान मुलांसाठी विशेष कोविड सेंटर; जिल्हा परिषदेचा निर्णय

नागूपर : कोरोनाच्या (Nagpur Corona Update) दोन लाटांमध्ये प्रशासनाची तारांबळ उडाली. भविष्यात मुलांना धोका लक्षात घेता जिल्हा परिषद प्रत्येक तालुक्यात मुलांसाठी एक कोविड केअर सेंटर (Covid Care Center) उभारणार आहे. अशा प्रकारचे सेंटर तयार करण्याचा निर्णय घेणारी राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद (Nagpur ZP) असणार आहे. (Covid care center for children in every district of Nagpur)

हेही वाचा: कोरोनाची लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवणं योग्य आहे का? जाणून घ्या डॉक्टरांचं मत

प्राथमिक आरोग्य केद्रात हे सेंटर असणार आहे. जिल्हा परिषदचे ग्रामीण भागात ५३ आरोग्य केंद्र आहेत. याकरता आवश्यक डॉक्टर, नर्स व इतर मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येणार आहे. ग्रामीण कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगण्यात येते. तो कमी करण्यासाठी प्रशासनाकडून उपाय योजना होत असल्या तरी त्या अपुऱ्या आहे.

आता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी संसर्ग जास्त असलेल्या गावांमध्ये भेटी देण्याचा उपक्रम सुरू केला. ग्रामीण भागात उपचाराची सोय नसल्याने कोरोना ग्रस्त ग्रामस्थांना शहरी भागात यावे लागते. मुलांसाठी हे अतिशय घातक ठरण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी व जवळच मुलांवर उपचार करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रास बाल कोविड सेंटर करण्यात येणार आहे. बाल रोग तज्ज्ञांचे एक पथकहे नियुक्त करण्यात येईल. या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने मुलांवर उपचार करण्यात येईल.

हेही वाचा: दुकानदारांनो, ११ च्या आत दुकानं करा बंद; आतापर्यंत नऊ लाखांचा दंड वसूल

कुंभारेंची सूचना

ग्रामीण भागातील अडचण लक्षात घेता प्राथमिक केंद्रात कोविड सेंटर तयार करण्याची सूचना माजी उपाध्यक्ष व आरोग्य सभापती मनोहर कुंभारे यांनी केली होती. अध्यक्ष बर्वे यांनी तात्काळ निर्णय घेत निधीचीही तरतूद करण्याचा निर्णय घेतला. १७ मे रोजी सर्व गट नेते व महत्त्वाच्या सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे.

गावातून शहरात येण्यासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे प्राथमिक केंद्रात सेंटर तयार करण्यात येईल. काही तालुक्यात आवश्यकतेनुसार दोन सेंटर तयार करू. २५ खाटा या रुग्णालयात असतील. याकरता खनिज व सेस फंडातील निधीचा उपयोग करण्याचे ठरविले आहे.
रश्मी बर्वे, अध्यक्ष. जि.प.

(Covid care center for children in every district of Nagpur)

Web Title: Covid Care Center For Children In Every District Of

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusNagpur
go to top