esakal | कोरोनाची लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवणं योग्य आहे का? जाणून घ्या डॉक्टरांचं मत
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाची लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवणं योग्य आहे का? जाणून घ्या डॉक्टरांचं मत

कोरोनाची लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवणं योग्य आहे का? जाणून घ्या डॉक्टरांचं मत

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर : कोरोना महामारीमुळे (Corona Virus Update) संपूर्ण जगात (World Corona Update) हाहाकार माजला आहे. गेल्या वर्षी आलेल्या पहिल्या लाटेनंतर आलेली दुसरी लाट अधिकच तीव्र आणि भयावह आहे. देशातही लाखो लोकांचा कोरोनानं (Corona India) मृत्यू झाला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे आता कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccination drive) उपलब्ध झाली आहे त्यामुळे अनेक लोकं लस घेत आहेत. या लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनाचा धोका कमी होतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र या लस घेण्यासंदर्भात अनेक प्रश्न निर्मण झाले आहेत. अशाच एका महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला देणार आहोत. (Doctors opinion about keeping physical relations after Corona Vaccination)

हेही वाचा: International Nurses Day : रुग्णांची अविरत सेवा करूनही तुटपुंजा पगार; परिचारिकांची व्यथा

कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. एकमेकांपासून ५ फुटांचं अंतर न राखल्यास याचा संसर्ग होऊ शकतो. मात्र अशा परिस्थतीत शारीरिक संबंध (Physical relation) ठेवणं योग्य आहे का? तसंच कोरोना लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेऊ शकतो का? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. अशाच काही प्रश्नांची उत्तरं आम्ही सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर संजय देशपांडे (Sexologist Doctor Sanjay Deshpande) यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे .

कोरोनाकाळात शारीरिक संबंध ठेवणं योग्य आहे का?

डॉक्टर देशपांडे यांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोनाकाळात शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. योग्य ती खबरदारी घेतली तर शारीरिक संबंध ठेवण्यास हरकत नाही. मात्र या दरम्यान आपल्याला सर्दी, खोकला, ताप किंवा कोरोनाची अन्य कुठलीही लक्षणं असतील तर शारीरिक संबंध प्रस्थापित करू नका.

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवता येईल का?

कोरोना लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास हरकत नाही. मात्र लस घेतल्यानंतर तुम्हाला ताप असल्यास शारीरिक संबंध ठेऊ नका. यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो. तसंच योग्य ती काळजी घेऊनच संबंध ठेवा.

लस घेतल्यानंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवता येईल?

डॉक्टर देशपांडे यांच्या म्हणण्याप्रमाणे, ज्या दिवशी लस घेतली त्या दिवशीही शारीरिक संबंध ठेवता येतील. यासाठी काळ आणि वेळेचं बंधन नाही. मात्र तुम्हाला कोरोनाशी निगडित कुठलीही लक्षणं असतील तर एकमेकांच्या जवळ येऊ नका.

लसीकरणानंतर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी कशी घ्यावी काळजी?

  • लसीकरणांनंतरही सर्दी, खोकला, ताप यांसारखी कोरोनाची कुठलीही लक्षणं आढळल्यास शारीरिक संबंध ठेऊ नका.

  • तुमच्या पार्टनरला अशा प्रकारची कुठलीही लक्षणं असतील आणि गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही एकमेकांच्या जवळ आले असल्यास त्वरित काळजी घ्या आणि कोरोना चाचणी करून घ्या.

  • तुमच्या पार्टनरला कोरोनाची लक्षणं नसतील मात्र तो किंवा ती कोरोना पॉझिटिव्ह असेल तर अशावेळी शारीरिक संबंध ठेवणं टाळा.

  • निरोध वापरताना योग्य ती काळजी घ्या.

हेही वाचा: वीज ग्राहकांनो, आता SMS द्वारे महावितरणला पाठवा तुमचं मीटर रिडींग; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

कोरोना लसीकरणानंतर शारीरिक संबंध ठेवण्यास काहीच हरकत नाही. मात्र योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. सुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यास तुमचा आणि तुमच्या पार्टनरचा कोरोनापासून बचाव होईल.
- डॉक्टर संजय देशपांडे, सेक्सॉलॉजिस्ट

(Doctors opinion about keeping physical relations after Corona Vaccination)

loading image
go to top