दुकानदारांनो, ११ च्या आत दुकानं करा बंद; आतापर्यंत नऊ लाखांचा दंड वसूल

दुकानदारांनो, ११ च्या आत दुकानं करा बंद; आतापर्यंत नऊ लाखांचा दंड वसूल

यवतमाळ : अत्यावश्‍यक सेवा (Essential services) नसतानाही शहरात अनेक दुकाने उघडी आहेत. याविरोधात महसूल प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी कापड दुकानांवर (Garmets store) कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी (ता.11) वेळ संपल्यानंतरही सुरू असलेल्या किराणा दुकानदाराला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. (Total 9 lacs fine collected through shopkeepers in Yavatmal)

दुकानदारांनो, ११ च्या आत दुकानं करा बंद; आतापर्यंत नऊ लाखांचा दंड वसूल
कोरोनाची लस घेतल्यानंतर शारीरिक संबंध ठेवणं योग्य आहे का? जाणून घ्या डॉक्टरांचं मत

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने मिशन बिगेनअंतर्गत 15 मेपर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. या काळात केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. शहरात नागरिक व काही व्यापाऱ्यांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी अत्यावश्‍यक सेवेत नसलेली दुकाने सुरू आहेत. महसूल पथकाने या विरोधात मोहीम सुरू केली आहे.

काही दिवसांपूर्वी नेताजी मार्केटमधील 12 दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर कापड शॉपिंग मॉलवर कारवाई करण्यात आली. मंगळवारी (ता.11) मेन लाइनमधील यशवंत किराणा दुकानावर कारवाई करण्यात आली. अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने अकरापर्यंत सुरू आहेत. त्यानंतरही किराणा दुकान सुरू होते. या दुकानावर तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या पथकाने कारवाई केली. या दुकानचालकाला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 50 हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

आतापर्यंत महसूल पथकाने जवळपास नऊ लाख रुपयांचा दंड वसूल केला. त्यानंतरही बदल झालेला दिसत नाही. शहरातील कोरोनास्थिती अजूनही आटोक्‍यात नाही. अशास्थितीत नियमांचे पालन होत नसल्याने मोठा धोका होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच महसूल प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. यावेळी डॉ. विजय अग्रवाल यांच्यासह महसूल, नगरपालिका व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

दुकानदारांनो, ११ च्या आत दुकानं करा बंद; आतापर्यंत नऊ लाखांचा दंड वसूल
रेमडेसिव्हिरचा काळाबाजार थांबता थांबेना! अमरावतीत दोन डॉक्‍टरांसह सात जणांना अटक

बाहेर फिरणाऱ्या 346 जणांची तपासणी

यवतमाळ शहरात विनाकारण फिरणाऱ्या 346 जणांची तपासणी करण्यात आली. शहरात तीन ठिकाणी तपासणी मोहीम राबविण्यात आली. दुचाकीने शहरभर फिरणाऱ्यांची ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. शहरात दररोज विनाकारण फिरणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. शिवाय 23 नागरिकांकडून प्रत्येकी दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आला.

(Total 9 lacs fine collected through shopkeepers in Yavatmal)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com