esakal | नागपूरकरांनो, दीक्षाभूमीवर ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू; बाह्यरुग्ण विभागाला प्रारंभ

बोलून बातमी शोधा

नागपूरकरांनो, दीक्षाभूमीवर ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू; बाह्यरुग्ण विभागाला प्रारंभ
नागपूरकरांनो, दीक्षाभूमीवर ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू; बाह्यरुग्ण विभागाला प्रारंभ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः दीक्षाभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान प्रसारित करणारी प्रयोगशाळा आहे. दीक्षाभूमीतून मानव भयमुक्त होतो. बंधमुक्‍त होतो. सार्वजनिक कल्याणाचा महामार्ग देणाऱ्या दीक्षाभूमीवर कोरोना हरवण्यासाठी प्रतिबंधक उपचार करण्यासाठी खुली करून देण्यात येत आहे. दीक्षाभूमीवर कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. पन्नास खाटांचे कोविड केअर युनिट तयार झाले असून नुकतेच येथे बाह्यरुग्ण विभाग कोरोनाबाधितांच्या सेवेत खुला करण्यात आला आहे.

हेही वाचा: कोल्डड्रींक्समधून विष देत होणाऱ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न; यवतमाळमधील वधूचा प्रताप

धम्मक्रांतीची प्रेरणा देणाऱ्या या भूमीवर कोरोनावर मात करण्यासाठी अनेक डॉक्टरांनी सेवा देण्याचे कबुल केले आहे. यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या पुढाकाराने समता सैनिक दलाची मदत घेत कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उदघाटन झाले.

हेही वाचा: लसीकरणाला शिस्त लावणारा 'अचलपूर पॅटर्न'ची सर्वत्र चर्चा ; वैद्यकीय अधिक्षकांनी लढवली शक्कल

बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला असून दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत रुग्ण तपासण्याला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील सेवेला प्रारंभ झाला असून स्मारक समिती, समता सैनिक दल आणि समता आरोग्य प्रतिष्ठानच्या मदतीने हा आरोग्याचा सेवाव्रती कार्यक्रम सुरू झाला आहे, अशी माहिती समता सैनिक दलाचे सैनिक विश्वार पाटील यांनी दिली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ