esakal | रुग्णांना दिलासा! नागपुरातील नॅशनल कँसर इन्स्टिट्यूटमध्ये शंभर बेड्सच्या कोविड रुग्णालयाचं उदघाटन
sakal

बोलून बातमी शोधा

NCR

रुग्णांना दिलासा! नागपुरातील नॅशनल कँसर इन्स्टिट्यूटमध्ये शंभर बेड्सच्या कोविड रुग्णालयाचं उदघाटन

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपुरात आज १०० खाटांच्या कोविड रुग्णालयाचे उदघाटन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर येथे करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रुग्णालयाचे उदघाटन केले. येत्या काही दिवसातच आणखी शंभर खाटा येथे उपलब्ध करण्यात येणार आहेत.

या प्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपुरात अधिकाधिक सुविधा निर्माण करण्यासाठी आपण सारेच प्रयत्न करीत आहोत. नितीन गडकरी यांनी सुध्दा ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे येत्या चारपच दिवसात स्थिती बऱ्यापैकी सुधारेल. आज सकाळीच आपण नागपूर महापालिकेतील स्थितीचा सुध्दा आढावा घेतला. पाचशे बेड आणखी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न होतो आहे. काल केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या उत्पादनासाठी अतिरिक्त साईट्सला मंजुरी दिली आहे.

हेही वाचा - अखेर मृत्यूनेच केली त्यांची सुटका; मुलानंतर वडिलांचीही आत्महत्या; अख्ख्या गावात हळहळ

आज कोविड संकटाचा आपण सामना करतो आहोत. पण त्यापेक्षा भीतीचे वातावरण अधिक आहे. त्यामुळे समुपदेशनाची प्रक्रिया हाती घेणे ही सुध्दा काळाची गरज आहे. गरज असेल त्यालाच रुग्णालयात दाखल करणे आणि आवश्यकता असेल तेव्हा, रेमडेसिवीरचा वापर यासाठी सुयोग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. काही सामाजिक संघटना आणि भाजपा वैद्यकीय आघाडीच्या मदतीने हे काम हाती घेतले जात आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्यावतीने चालविल्या जाणाऱ्या एनसीआयमध्ये या सुविधेत २० बेड हे व्हेंटिलेटरसह तर उर्वरित ८० हे ऑक्सिजन बेडस असल्याचे सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ