Crime news : सावधान! फ्री फायर गेमच्या माध्यमातून अपहरणाची धमकी

सायबर चोरट्याने एक लाखाची खंडणी केली वसूल
ऑनलाइन खेळ खेळत असल्यास सावधान
ऑनलाइन खेळ खेळत असल्यास सावधानsakal

नागपूर : ऑनलाइन खेळ खेळत असल्यास सावधान. सायबर चोरट्याच्या माध्यमातून ऑनलाइन खेळ खेळणाऱ्या अकरा वर्षांच्या मुलाला बहिणीच्या अपहरणाची धमकी देत खंडणी वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे खेळाचा माध्यमातून आईच्या युपीआय आयडीचा पिन माहिती करून घेत, त्याच्या खात्यातून एक लाख रुपयेही लंपास केले.

एस. के. भाईजान व प्रमोद कालू उर्फ बोरा अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यु-ट्यूब इन्फ्युअन्सर असलेल्या महिलेचा मुलगा त्यांच्या मोबाईलवर फ्री फायर गेम खेळतो. २० दिवसांपूर्वी एस.के.भाईजान व प्रमोद कालू उर्फ बोरा हे गेममध्ये सहभागी झाले.

त्यांनी या मुलाकडून कुटुंबातील सदस्यांची माहिती काढली. यावेळी त्यांनी त्याला फुस लावून त्याच्याकडून महिलेच्या युपीआय आयडीचा पीन क्रमांकही जाणून घेतला. तसेच विद्यार्थी व त्याच्या बहिणीचे शाळेतून अपहरण करण्याची धमकी दिली. आईच्या खात्यातून त्याला गुगल पेद्वारे एक लाख २ हजार रुपये दोघांनी स्वत:च्या खात्यात जमा करायला लावले.

भीतीमुळे विद्यार्थ्याने आईच्या खात्यातून ही रक्कम सायबर गुन्हेगारांच्या खात्यात वळती केली.त्यानंतर ८ एप्रिलला तो या दहशतीपोटी आजारी पडला. त्यात तो रडत असल्याने आईने त्याला विचारणा केली, यावेळी त्याने सर्व माहिती दिली. त्यातून महिलेने तत्काळ कोराडी पोलिसांकडे धाव घेत, तक्रार दाखल केली. पोलिसांनी आयटी ॲक्टनुसार दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com