Crime News : अठरा पानी चिठ्ठी लिहून आत्महत्या

स्वतःलाच ठरविले जबाबदार
Crime News Suicide by writing eighteen-page letter nagpur
Crime News Suicide by writing eighteen-page letter nagpurSakal

नागपूर : प्रतापनगर पोलिस हद्दीत स्नेहनगर येथील चिंतामणी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीने १८ पानी सुसाईड नोट लिहून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता.६) सकाळी ११ ते रात्री साडेआठ दरम्यान घडली. योगेश दौलतराव पाने (वय ३५, रा.स्नेहनगर) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो सुरक्षारक्षक होता. मंगळवारी रात्री साडेआठ वाजता पत्नी घरी आली असताना पती दार उघडत नसल्याने तिने आपल्या भावाला फोनवरून माहिती दिली.

त्याने मित्रासह येऊन दार तोडले असता, त्याला योगेशने इलेक्ट्रीकच्या वायरने गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत प्रतापनगर पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये पाठविला. यावेळी त्याच्याजवळ १८ पानी सुसाईड नोट सापडली. त्यात केवळ ‘मीच माझा मृत्यूला जबाबदार’ असे वारंवार लिहून ठेवले होते. त्याने नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे कळू शकले नाही. यावेळी त्यांचा साळा संकेत गजानन शेळके (वय २७, रा. पांडे ले आउट) यांनी दिलेल्या सुचनेवरुन प्रतापनगर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com