esakal | नागपूर विद्यापीठात प्रवेशबंदीमुळे विद्यार्थ्यांसमोर उभे ठाकले हे संकट
sakal

बोलून बातमी शोधा

Crisis in front of students due to entry ban in Nagpur University

विद्यापीठाने यावर्षीपासून पदवी प्रवेशासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत ८८ हजारांवर विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी केली. यापैकी ६६ हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चिती केली आहे.

नागपूर विद्यापीठात प्रवेशबंदीमुळे विद्यार्थ्यांसमोर उभे ठाकले हे संकट

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर :  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ३१ ऑगस्टपर्यंत विद्यापीठाबाहेरील व्यक्तीस प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली आहे. या प्रकाराने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले प्रमाणपत्र मिळणे जवळपास अशक्य होणार आहे. पदवी प्रवेशास सुरुवात झाली असताना विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र न मिळाल्यास प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विद्यापीठाने यावर्षीपासून पदवी प्रवेशासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत ८८ हजारांवर विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी केली. यापैकी ६६ हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चिती केली आहे. गुरुवारपासून गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यास सुरुवात झाली. २४ ऑगस्टपर्यंत प्रवेश दिल्या जाणार आहे. 

सविस्तर वाचा - मौजमजा करताना ‘ते’ बनले नावाडी, हाकली नाव आणि स्वतःचा ठरले कर्दनकाळ...
 

२५ ते २८ ऑगस्टदरम्यान प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. नागपूर विद्यापीठाप्रमाणेच इतर विद्यापीठातही प्रवेशाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना मायग्रेशन आणि इलिजिबिलीटी प्रमाणपत्राची गरज पडते. हे प्रमाणपत्र विद्यापीठातून मिळत असते. आता विद्यापीठ बंद ठेवल्यास विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रापासून वंचित राहावे लागणार आहे. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी त्याची गरज पडत नसली तरी, इतर वर्षातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

विद्यार्थी संघटना आक्रमक

कुलगुरूंनी काढलेल्या आदेशामुळे विद्यापीठात आता विद्यार्थ्यांना येण्यास मनाई करण्यात आलेली आहे. याविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक असून, याविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी सिनेट सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.

असे आहे वेळापत्रक

  • २० ते २४ ऑगस्ट - गुणवत्ता यादीनुसार प्रवेश
  • २५ ते २८ ऑगस्ट - प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश
  • २८ ऑगस्टनंतर - थेट प्रवेश

विद्यापीठामधील शाखानिहाय जागा

  • कला - ४०,०००
  • वाणिज्य - ३०,०००
  • विज्ञान - ३५,०००
  • विधी - १५००
  • गृहविज्ञान - ४००
  • गृहअर्थशास्त्र - ५०० 
  • संपादन : अतुल मांगे
loading image
go to top