esakal | मदतीचे निकष बदलणे आवश्यक - विजय वडेट्‍टीवार
sakal

बोलून बातमी शोधा

विजय वडेट्टीवार

मदतीचे निकष बदलणे आवश्यक - विजय वडेट्‍टीवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मागील पन्नास वर्षांत झाले नाही तेवढे नुकसान यंदा झालेल्या अतिवृष्टीने झाले आहे. मात्र शेतकऱ्यांना जुन्याच निकषांप्रमाणे मदत दिली जाते. हे निकष बदलण्याची वेळ आली आहे. याकरिता केंद्र सरकारकडे राष्ट्रीय आपत्ती मदत निधीत (एनडीआरएफ) बदल करून भरपाई वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्‍टीवार यांनी शनिवारी दिली.

राज्याच्या अनेक भागात यंदा अतिवृष्टी झाली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जून अखेरपर्यंत तब्बल १७ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यातील मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत पोचविण्यात आली आहे.

हेही वाचा: अमरावती : शेतात वीज पडली; दहा जण थोडक्यात बचावले

जनावरे वाहून गेली त्याचाही मोबदला देण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातील महिलांवर अत्याचार वाढले आहेत. याकडे लक्ष वेधले असता त्यांनी संपूर्ण देशातच अशा घटना वाढल्याचे निदर्शनास आणून दिले. मुंबईतील आरोपींना कडक शिक्षा झालीच पाहिजे असे वडेट्‍टीवार म्हणाले.

‘महाज्योती’ची चाचणी परीक्षा कालच घोषित करण्यात आली आहे. परीक्षेचा कालावधी १० ऑक्टोबरपर्यंत आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना दिलेली मुदत अडचणीची वाटत असेल तर त्यांच्या हितासाठी परीक्षा पुढे ढकलण्याची आमची तयारी आहे. परीक्षेपासून विद्यार्थी वंचित राहणार नाही अशी ‘महाज्योती’ची भूमिका आहे.

- विजय वडेट्‍टीवार, मदत व पुनर्वसनमंत्री

loading image
go to top