तुम्हालाही मेसेजमध्ये लिंक आली असेल तर सावधान, क्लिक करताच बँक खाते होईल खाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cyber criminals send link in message for online fraud

दिवाळीनिमित्त अनेकांनी ऑनलाइन शॉपिंगवर जोर दिला आहे. तसेच गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अनेकांनी बँकेचे व्यवहार वाढवले आहेत. हिच संधी साधून सायबर क्रिमिनल्स सक्रिय झाले आहेत. त्यांना अनेकांचे मोबाईलवर आणि ई मेलवर जाळ्यात ओढण्यासाठी लिंक पाठविणे सुरू केले आहे.

तुम्हालाही मेसेजमध्ये लिंक आली असेल तर सावधान, क्लिक करताच बँक खाते होईल खाली

नागपूर : दिवाळी सणानिमित्त वाढती ऑनलाइन शॉपिंग पाहता सायबर गुन्हेगार सक्रीय झाले आहेत. अनेकांना एसएमएस आणि ई मेलवर लिंक पाठवून पैसे कमविण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढत आहेत. सायबर फिशींगच्या या प्रकारामुळे अनेकांची आर्थिक फसवणूक होत असून त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. 

दिवाळीनिमित्त अनेकांनी ऑनलाइन शॉपिंगवर जोर दिला आहे. तसेच गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अनेकांनी बँकेचे व्यवहार वाढवले आहेत. हिच संधी साधून सायबर क्रिमिनल्स सक्रिय झाले आहेत. त्यांना अनेकांचे मोबाईलवर आणि ई मेलवर जाळ्यात ओढण्यासाठी लिंक पाठविणे सुरू केले आहे. दिवाळीला दोन ते तीन दिवस बाकी असतानाच ऑनलाइन खरेदीची लगबग वाढत असल्यामुळे सायबर गुन्हेगारांनी थेट ऑफर किंवा पेटीएम आणि 'गुगल पे'ने गिफ्ट पाठविल्याचा एसएमएस पाठविणे सुरू केले आहे. दिवाळीनिमित्त एखाद्या मोठ्या कंपनीने आपल्याला गिफ्ट पाठविल्याचे ईमेल अनेकांना येत आहेत. अनेकांना मेलमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करून आपले गिफ्ट पाहण्याचा मोह आवरत नाही आहे. त्यामुळे आलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्या खात्यातील रक्कम गमवत आहेत. जनजागृतीअभावी सायबर गुन्हेगारांचे फावत आहे. 

हेही वाचा - हॉटेल, लॉज मालकांनो रेकॉर्ड अपडेट ठेवा; अन्यथा होणार...

अ‌ॅप इंस्टॉल करू नका - 
मेसेजमधील लिंकद्वारे तुम्हाला एक अ‌ॅप इन्स्टॉल करायला सांगितले जाते.  हे अ‌ॅप इन्स्टॉल करताना तुमच्या मोबाईल डेटाच्या अ‌ॅक्सेस मागितला जातो. परमिशन दिल्यास या अ‌ॅपच्या माध्यमातून तुमचा मोबाईल नंबर, तुमचे नाव, लोकेशन, फोन स्टोरेज आणि तुमच्या विषयी तुमच्या मोबाईलमद्ये असलेली इतर माहिती अ‌ॅपच्या डेव्हलपरकडे सेव्ह होते. त्यामुळे अशा स्वरुपातील एसएमएस जर कोणाला आला असेल तर त्यामधील लिंकवर क्लिक करू नये. 

हेही वाचा - महाविकास आघाडीत बिघाडी; काँग्रेसने उमेदवार दिल्यावरही...

मोबाईलवर पाठविलेल्या लिंकवर क्लिक केल्यास आपला बँक डेटा सायबर गुन्हेगारांकडे जाऊ शकतो. बँक खात्यातून पैसे काढण्यासाठीही त्याचा वापर केला जाऊ शकतो. असा एसएमएस जर तुम्हाला आला असेल तर त्यामधील लिंकवर क्लिक न करता तो एसएमएस डिलीट करावा. जर चुकून कुणी त्या लिंकवर क्लिक केले आणि खात्यातून पैसे कपात झाल्यास घाबरू नका. लगेच २४ तासांच्या आत सायबर क्राईमकडे तक्रार करा. पोलिस तक्रारीची दखल घेत आरोपींचा शोध घेतील. 
- केशव वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम 

loading image
go to top