पत्नी, मुलगा तीन तास पंप दाबून रुग्णाला देत होते ऑक्सिजन; मात्र...

पत्नी, मुलगा तीन तास पंप दाबून रुग्णाला देत होते ऑक्सिजन; मात्र...

नागपूर : शहरात कोरोनाबाधितांना (coronavirus) उपेक्षेची वागणूक मिळत आहे. बुधवारी (ता. ५) मेडिकलच्या (Medical hospital) कॅज्युअल्टीमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. तीन तास त्याला ऑक्सिजन मास्क (Oxygen mask) लावून ठेवले. औषधोपचारापासून वंचित ठेवले. कोणीही लक्ष न दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाइकांनी केला. मृताचे नाव विजय डोले (वय ५२) असे आहे. (Death of a patient in medical without the attention of a doctor)

विशेष असे की, विजय यांना श्वसनाचा त्रास होता. यकृत तसेच मूळव्याधीचा त्रास होता. हे सांगिल्यानंतरही प्रारंभी नरेंद्रनगर येथील कंटेनर हाउसमध्ये नेले असता तेथे कोरोना पॉझिटिव्ह, असा शेरा दिला. रुग्णाचे नातेवाईक राजेश सोपान यांनी सांगितले की, डोले यांना कोरोना नव्हताच. रुग्णाची प्रकृती सामान्य होती. परंतु, मंगळवारी रात्रीपासूनच त्यांची प्रकृती ठीक नव्हती. बुधवारी अचानक श्वास घेण्यास त्रास झाला. त्यानंतर त्यांना नरेंद्रनगरच्या कंटेनर डेपोत नेले. तेथे उपस्थित डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केली. त्यानंतर एक पेपर तयार करण्यात आला. ज्यामध्ये रुग्णाला कोरोनाबाधित असल्याचे लिहिले आणि मेडिकलमध्ये रेफर केले.

पत्नी, मुलगा तीन तास पंप दाबून रुग्णाला देत होते ऑक्सिजन; मात्र...
रक्त पातळ करणारे इंजेक्शन संपले, तरीही प्रिक्स्रिप्शनवर लिहून देण्यास डॉक्टरांची टाळाटाळ

बुधवारी दुपारी ३ वाजता रुग्णाला मेडिकलमध्ये आणले. स्ट्रेचरवर ठेवले. रुग्णाच्या नातेवाईक तीन तास एनआरएम मास्कद्वारे पंप दाबून ऑक्सिजन देत होते. रुग्णाची पत्नी आणि मुलगा सलग तीन तास पंप करीत होते. रुग्णाला ऑक्सिजन लावले नाही. डॉक्टरांना सांगितले असता त्यांनी नकार दिला. थोड्या वेळाने रुग्णाला खाटेवर ठेवले. मात्र, सायंकाळी ६ च्या सुमारात त्यांचा श्वास थांबला.

सीएमओ स्वतःला समजात तज्ज्ञ

रुग्णाला ऑक्सिजन लावा, अशी वारंवार विनवणी केल्यानंतरही मेडिकलच्या कॅज्युल्टीत कोणीही ऐकत नव्हते. मेडिकलमधील सीएमओंना विचारणा केली; मात्र ते स्वतःला तज्ज्ञ समजून उर्मटपणे वागत असल्याची तक्रार नातेवाइकांनी केली. दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न करण्यात येत असतानाच रुग्णाचा मृत्यू झाला.

(Death of a patient in medical without the attention of a doctor)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com