esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

 मुखवटा घालून कचरा ढिगाऱ्यांचे लोकार्पण

महापौर, आयुक्तांचा मुखवटा घालून कचरा ढिगाऱ्यांचे लोकार्पण

sakal_logo
By
- राजेश प्रायकर

नागपूर : नागरी समस्यांकडे महापालिकेचे लक्ष वेधन्यासाठी नागपूर सिटीझन्स फोरमने अनेकदा अभिनव पद्धतीने आंदोलन केले. आजही सिटिझन्स फोरमने शहराच्या पदाधिकारी, प्रतिनिधींनी महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी. यांचा मुखवटा घालून शहरातील कचरा साचलेल्या ७५ ठिकाणा भेट दिली. त्यांनी फित कापून कचरा ढिगाऱ्यांचे लोकार्पण करून कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष वेधले.

महानगरपालिकेने शहराला ‘बीन फ्री सिटी’ अर्थात कचरापेटी मुक्त शहर घोषित केले आहे. वस्त्या वस्त्यांमध्ये कचरा संकलनासाठी ठेवण्यात आलेल्या कचरा पेट्या किंवा मोठे कंटेनर काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचल्याचे पहायला मिळते. अनेक वस्त्यांमध्ये कचरा गाड्या नियमित येत नसल्यामुळे लोकांना नाईलाजाने कचरा बाहेर उघड्यावर, मोकळ्या मैदानात फेकावा लागत आहे. ओल्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा: Aundh : औंधरस्ता येथे महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन

या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिटीझन्स फोरमने रविवारी पश्चिम नागपुरातील पोलिस लाईन टाकळी, उत्तर नागपुरातील राणी दुर्गावतीनगर, मध्य नागपुरातील रेल्वे स्टेशन व काॅटन मार्केट परिसरातील कचरा ढिगाऱ्याचे फित कापून लोकार्पण करण्यात आले. फित कापताना सिटिझन्स फोरमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांचा मुखवटा घातला होता. शहरातील ७५ कचरा ढिगाऱ्यासमोर लाल फित कापून लोकार्पण करण्यात आले.

यापुढे नगरसेवक, महापौरांचे नाव देणार येत्या काळात ज्या ज्या ठिकाणी कचरा दिसेल त्याठिकाणी पदाधिकारी, अधिकारी व नगरसेवकांच्या नावाने त्या जागेचे नामकरण करण्यात येईल, असा ईशारा नागपूर सिटीझन्स फोरमने दिला. स्वच्छ व सुंदर शहराचा ठेंभा मिरवला जातो. मात्र हा दावा किती फोल आहे असेही सिटिझन्स फोरमने स्पष्ट केले.

शहरातील कचऱ्याबाबत महापालिका प्रशासन तसेच पदाधिकारीही गंभीर नाही. निवेदन, अर्ज, विनंत्या करुन कचऱ्याची समस्या सुटत नसल्यामुळे नाईलाजाने आंदोलन करावे लागत आहे. महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवून ही समस्या मार्गी लावण्याची गरज आहे.

loading image
go to top