गटातटांमुळे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षाची नियुक्ती रखडली

anil deshmukh
anil deshmukhe sakal

नागपूर : अनिल अहीरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर एकमताने राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष (NCP) निवडण्यात येईल अशी शक्यता वर्तविली जात असली तरी गटातटांनी डोके वर काढल्याने ही प्रक्रिया लांबली आहे. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) कोणाच्या पारड्यात वजन टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (delay in appointment of Nagpur NCP president due to groupism)

anil deshmukh
पोटात चाकू खुपसलेल्या अवस्थेत युवक थेट पोहोचला पोलिस ठाण्यात

अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षात आहे. त्यामुळे जिल्ह्यात नियुक्ती करताना त्यांचे मत विचारात घेतले जाते. ते दोन दिवसानंतर नागपूरला येत आहेत. या दरम्यान गोसेखूर्दच्या दौऱ्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील आठवड्याच्या शेवटी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते नागपूर मुक्कामी आल्यानंतरच अध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे मानल्या जात आहे.

नगरसेवक दुनेश्वर पेठे यांचे नाव अध्यक्षपदासाठी सर्वाधिक आघाडीवर आहे. मात्र मावळत्या अध्यक्षांनी त्यांच्या विरोधात राग आवळला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी पेठे यांचा थेट उल्लेख न अप्रत्यक्षपणे त्यांच्या नावाला विरोध दर्शवला. असे असले तरी अनिल देशमुख यांच्या यादीत पेठे यांचे नाव सर्वांत वरच्या क्रमांकावर आहे. जय जवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि जिल्हा समन्वयक माजी आमदार राजू जैन हे पवारांच्या बाजूने असल्याचे समजते. त्यांच्या आग्रहावरून पवार राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. पेठे नको म्हणून अहीरकर यांनीही पर्यायी नाव म्हणून पवार यांच्या नावाचे पत्र प्रदेश कार्यकारिणीला दिल्याचे समजते.

anil deshmukh
नागपुरात झोपडपट्ट्यांसह तब्बल सव्वाशे वस्त्यांना पुराचा धोका

प्रदेश कार्यकारणीत डझनभर नेते

अनिल अहीरकर यांचा प्रदेश उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीने नियुक्ती केली आहे. त्यापूर्वीच नगरसेविका आभा पांडे यांना प्रदेश महासचिव करण्यात आले. प्रवीण कुंटे महासचिव आणि प्रदेश प्रवक्ते आहेत. वर्षा शामुकळे महासचिव, गंगाप्रसाद ग्वालवंशी, वेदप्रकाश आर्य, दीनानाथ पडोळे आहेतच. दिलीप पनकुले प्रदेश सरचिटणीस म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत.

(delay in appointment of Nagpur NCP president due to groupism)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com