

sakal
नागपूर: ऑनलाइन डिलिव्हरी क्षेत्रातील नामांकित ‘इंस्टाकार्ट’ कंपनीतील डिलिव्हरी बॉय असलेल्या ११ जणांनी पार्सलमधील महागड्या वस्तू परस्पर काढून घेत, २२ लाख ३४ हजार ९६३ रुपयांचा अपहार केला. हा अपहार नागपूर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संगनमताने केल्याचे कंपनीच्या ऑडिटमधून पुढे आले आहे. याप्रकरणी पुण्यातील कंपनीचे अधिकारी प्रकाश रतीलाल शहा (वय ६५, रा. पार्षवनगर, पुणे) यांनी राणाप्रतापनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.