लोंढेंच्या फुकटच्या सल्ल्याची फडणवीसांना गरज नाही - संदीप जोशी

नगरसेवक पदाची निवडणूक जिंकून येण्याची पात्रता नसलेल्या अतुल लोंढे यांच्या फुकटच्या सल्ल्याची गरज नाही, असा घणाघाती टोला ; संदीप जोशी
devendra Fadnavis does not need free advice from Atul Londhe Sandeep Joshi nagpur
devendra Fadnavis does not need free advice from Atul Londhe Sandeep Joshi nagpur google

नागपूर : देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) हे मागील ३० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. दोनदा महापौर, पाच वेळा आमदार आणि एकदा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे नगरसेवक पदाची देखील निवडणूक न लढलेल्या व ती जिंकून येण्याची अजिबात पात्रता नसलेल्या अतुल लोंढे यांच्या फुकटच्या सल्ल्याची त्यांना मुळीच गरज नाही, असा घणाघाती टोला भाजप नेते, माजी महापौर संदीप जोशी यांनी लगावला.

पक्षात कोणी विचारत नसल्याने स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी लोंढे हे फडणवीस यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांवर टीका करीत आहेत. त्यापेक्षा त्यांनी मागील दोन वर्षांपासून नागपूर शहरामध्ये अधिवेशन का घेतले नाही, काँग्रेसचे नेते मूग गिळून का बसले आहेत याची विचारणा त्यांनी आपल्या पक्षाकडे करावी. फडणवीस मुंबईच्या झगमगाटात हरवले आहेत अशा पद्धतीचे बालिश आरोप करून स्वत:ची फुकटची प्रसिद्धी करून घेणे लोंढेंनी थांबवावे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाच्या प्रश्नांसाठी किमान दोन आठवड्यांचे अधिवेशन घेतले आहे.

देवेंद्र फडणवीस हवेत आरोप करीत नाहीत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार किती नालायक सरकार आहे हे लोकांसमोर आणत आहे. सरकारमधील भ्रष्टाचाराचे एकेक प्रकरणे ते बाहेर काढत आहेत. त्याचे पुरावेसुद्धा ते सादर करीत आहेत. म्हणून नागपूर शहरातीलच नव्हे महाराष्ट्रातील जनता देवेंद्र फडणवीसांच्या मागे खंबीरपणे आहे. कधीकाळी ज्यांची महाराष्ट्रात, देशात सत्ता होती तो पक्ष आता चवथ्या क्रमांकावर गेलेला आहे, याचा विसर लोंढेंना पडलेला असावा. फडणवीस यांना फुकटचा सल्ला देण्याची बालिश धडपड करू नये, असेही जोशी यांनी लोंढे यांना सुनावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com