धर्मभास्कर सदगुरुदास महाराजांचं नागपुरात निधन

Sadgurudas maharaj Passes Away धर्मभास्कर सदगुरुदास महाराजांचं वयाच्या ८६ व्या वर्षी नागपुरात निधन झालं. सद्‌गुरूदास महाराजांनी शिवकार्यासोबतच आध्यात्मिक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे.
Sadgurudas Maharaj known for spiritual and social work passes away

Sadgurudas Maharaj known for spiritual and social work passes away

Esakal

Updated on

धर्मभास्कर सद्गुरूदास महाराज उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख (वय ८४) यांचे आज सायंकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी हृदयविकारामुळे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा अजेय देशमुख, तीन मुली आणि बराच मोठा आप्त व शिष्य परिवार आहे. त्यांच्या निधनाने छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक व गुरुमंदिर परिवाराचा आधारस्तंभ निखळला आहे. सद्‌गुरूदास महाराजांनी शिवकार्यासोबतच आध्यात्मिक क्षेत्रात भरीव कार्य केले. वेद, उपनिषदे, पुराणे यांतील कठीण विषय त्यांनी अत्यंत सोप्या मराठी भाषेत जनसामान्यांपर्यंत पोहोचविले. प्रवचने, व्याख्याने, सत्संग, कीर्तनांद्वारे त्यांनी समाजप्रबोधन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com