
नागपूर : सायबर फसवणुकीच्या एका धक्कादायक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निवृत्त प्रशासकीय न्यायमूर्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधिज्ञ विजय डागा यांना बनावट 'डिजिटल अटक' ऑपरेशनद्वारे पोलीस अधिकारी म्हणून भासवणाऱ्यांनी लक्ष्य केले होते. आरोपींनी न्या. डागा यांना दोन कोटी रुपये खंडणीची मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु, न्या. डागा यांनी योग्य काळजी घेतल्याने पुढील धोका टळला.