esakal | भाजपात असंतोष; शहर कार्यकारिणीवरून नाराजी, बैठकीला अनेकांनी दांडी
sakal

बोलून बातमी शोधा

Dissatisfied with the BJP executive

नाही म्हणायला दोन-दोन डझन उपाध्यक्ष आणि मंत्री करून अनेकांना पक्षात कायम राहावे याची सोय करण्यात आली आहे. आधीच्या शहराध्यक्षांच्या वैयक्तिक नाराजीचा फटका बसलेल्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले जाईल असे वाटत होते. मात्र, त्यांनाही वेटिंगवरच ठेवण्यात आले आहे.

भाजपात असंतोष; शहर कार्यकारिणीवरून नाराजी, बैठकीला अनेकांनी दांडी

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : शिस्तप्रिय भाजपात शहर कार्यकारिणीवरून असंतोष निर्माण झाला आहे. कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर बोलावलेल्या बैठकीला अनेकांनी दांडी मारून आपली नाराजी दर्शवली. कोरोनाचे कारण देऊन पक्षातर्फे सारवासारव करण्यात आली असली तरी अनेकांनी खासगीत राग व्यक्त करून आपण नाखूश असल्याचे सांगितले.

भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके निष्ठावंतांपैकी एक आहेत. भाजयुमोचेही ते पदाधिकारी होते. त्यामुळे शहरात त्यांचा संपर्क आहे. प्रत्येकाशी वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांची टीम सर्वसमावेशक व संतुलित राहील असे अनेकांना वाटत होते. शहराच्या महामंत्र्यांमध्ये प्रत्येकवेळी एक अनुसूचित जाती जमातीचा प्रतिनिधी असायचा.

सविस्तर वाचा - विवाहितेची कमाल! जिवंत पतीला मृत दाखवून लाटले शासकीय अनुदान अन् केले दुसरे लग्न

माजी उपमहापौर संदीप जाधव दोनवेळा, धर्मपाल मेश्राम एकवेळ महामंत्री होते. ते महापालिकेत पदाधिकारी झाले असल्याने त्यांच्याऐवजी दुसऱ्याला स्थान देण्यात आले नाही. राजेश हातीबेड यांना अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष करण्यात आले आहेत. याबद्दल कुणाचा वाद नाही. मात्र, मुख्य कार्यकारिणीत स्थान देण्यात आले नसल्याने अनेकांनी नाराजी बोलून दाखवली आहे.

संजय बंगाले आणि सुनील मित्रा यांना महामंत्री करण्यात आले आहे. हे दोघेही पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील आहेत. मात्र, शेजारच्याच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून एकही महामंत्री घेण्यात आला नाही.

जाणून घ्या - शेतकऱ्याला अखेर मिळाले पिकविम्याचे पैसे; रक्कम वाचून बसेल धक्का

ही बाब अनेकांना खटकली. विधानसभेच्या आधी इतर पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांना कार्यकारिणीत स्थान देऊन आपलेसे केले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, सर्वांना विशेष निमंत्रितांमध्ये कोंबण्यात आले.

नाही म्हणायला दोन-दोन डझन उपाध्यक्ष आणि मंत्री करून अनेकांना पक्षात कायम राहावे याची सोय करण्यात आली आहे. आधीच्या शहराध्यक्षांच्या वैयक्तिक नाराजीचा फटका बसलेल्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणले जाईल असे वाटत होते. मात्र, त्यांनाही वेटिंगवरच ठेवण्यात आले आहे. आगामी महापालिकेची निवडणूक वॉर्डनिहाय होणार आहे. अंतर्गत नाराजीचा फटका त्यामुळे भाजपला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा - 'जय-विरू'चं अनोख प्रेम! एक बैल हातपंपावर पाणी हापसतो, तर दुसरा पितो

नाराजीची प्रमुख कारणे

  • एकाच विधानसभा मतदारसंघातील दोघांना महामंत्री करणे
  • अनुसूचित जातीला मुख्य कार्यकारिणीत स्थान नाही
  • महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुकीत पक्षात दाखल झालेल्यांची दखलही घेण्यात आली नाही
  • अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करणाऱ्यांना डावलणे
  • काही जणांवर विशेष मर्जी दाखवली

संपादन - नीलेश डाखोरे