

Heartbreaking Incident: Chandrapur Farmer’s Organ Trade Exposes Harsh Reality
Sakal
चंद्रपूर: माणुसकीला काळिमा फासणारी, महाराष्ट्राच्या अंतःकरणाला हादरवून टाकणारी खळबळजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आली आहे. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या एका शेतकऱ्याला सावकारांनी थेट स्वतःची किडनी विकण्यास भाग पाडल्याचा अमानवी प्रकार उघडकीस आला आहे. व्यवस्थेचा बळी ठरलेल्या शेतकऱ्याचे नाव रोशन सदाशिव कुडे (वय ३६) असे आहे. तो जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील रहिवासी आहे.