esakal | आग प्रतिबंधात्मक 'एसओपी'सादर करा, कोविड रुग्णालयांना विभागीय आयुक्तांचे निर्देश

बोलून बातमी शोधा

representative image

आग प्रतिबंधात्मक 'एसओपी'सादर करा, कोविड रुग्णालयांना विभागीय आयुक्तांचे निर्देश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भंडारा, नाशिक आणि वाडी येथील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर विभागातील कोविड रुग्णालयांनी आग प्रतिबंधात्मक व सुरक्षात्मक एसओपी सादर करण्याचेनिर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी रुग्णालयांना आज दिले.

हेही वाचा: 'ते' पाळतात माणुसकीचा धर्म! मुस्लिम तरुण रचतात चिता अन्‌ देतात भडाग्नीही; 923 मृतांवर अंत्यसंस्कार

सर्व कोविड रुग्णालय प्रशासनाने आग प्रतिबंधात्मक आणि उपाययोजनांच्या साधनांची तपासणी करून घ्यावे. रुग्णालयात सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेताना काही अडचणी, शंका किंवा तक्रारी असल्यास अभियंता नीलेश उकुंडे यांच्याशी संपर्क साधावा आणि पुढील दोन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी केल्या आहेत.

रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा किंवा प्लँट आणि वितरण व्यवस्थेतील आग प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना येणाऱ्या त्रुटी दूर कराव्यात. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नोज मास्क २० आणि फेसशिल्ड रुग्णालयाच्या गेटवर आणि उर्वरीत अतिदक्षता विभागामध्ये पुरविण्याच्या सूचना केल्या आहेत. रुग्णालयातील सर्व इलेक्ट्रीकल फिटींग आणि त्यांच्या जोडण्या सुस्थितीत असल्याची खातरजमा करुन घ्यावी. ही जोडणी आणि फिटींग अधिकृत विद्युत अभियंत्याकडून तपासून घ्यावी. तसेच रुग्णालयात अतिरिक्त वीज जोडणी देण्यापूर्वी व्हेंटीलेटर आणि इतर बाबींसंबंधी विद्युत अभियंत्याचा सल्ला घ्यावा, असेही विभागीय आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.