घटस्फोटानंतर दुसरे लग्न करणे म्हणजे कौटुंबिक हिंसाचार नाही

घटस्फोटानंतर दुसरे लग्न करणे म्हणजे कौटुंबिक हिंसाचार नाही

नागपूर : घटस्फोट झाल्यानंतर पुरुषाने दुसरे लग्न करणे ही क्रूरता नाही. त्यामुळे या आरोपाखाली त्याच्या आणि कुटुंबीयांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल करणे अयोग्य असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. अकोला येथील रहिवासी खुशाल (नाव बदललेले) आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ही याचिका दाखल केली होती.

या प्रकरणी न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, खुशालचे २०११ साली खुशी (नाव बदललेले) हिच्यासोबत लग्न झाले. विवाहानंतर सुरू झालेल्या वादातून खुशाल यांनी २०१४ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. कौटुंबिक न्यायालयाने तो मान्य केला. पुढे खुशीने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.

घटस्फोटानंतर दुसरे लग्न करणे म्हणजे कौटुंबिक हिंसाचार नाही
मुलांच्या जाण्याने आई-वडिलांनी तर पतीच्या जाण्याने बायकांनी फोडला टाहो

मात्र, न्यायालयाने ते आव्हान फेटाळून लावले. त्यानंतर शुशीने उच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष अनुमती याचिकासुद्धा न्यायालयाने फेटाळून लावली. अखेर २०१६ मध्ये तिने खावटीसाठी अर्ज केला. तिने दिलेल्या तक्रारीनुसार खुशालने दुसरे लग्न केल्याने तिला कौटुंबिक हिंसाचाराला तोंड द्यावे लागले होते. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणी खुशाल आणि त्याच्या कुटुंबीयांना नोटीस बजावली होती.

खुशीने या नोटिशीला उच्च न्यायालयात आव्हान दिले. तेव्हा न्यायालयाने महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. न्यायालयाने नोंदविलेल्या निरिक्षणानुसार, कौटुंबिक हिंसाचारात शारीरिक, मानसिक, लैंगिक छळ करणे, शिवीगाळ करणे या बाबींचा समावेश होतो. मात्र, पहिल्या लग्नात घटस्फोट झाल्यानंतर दुसरे लग्न करणे ही क्रूरता ठरू शकत नाही, ते कौटुंबिक हिंसाचारात मोडत नाही.

घटस्फोटानंतर दुसरे लग्न करणे म्हणजे कौटुंबिक हिंसाचार नाही
अफगाणिस्तानातून १२९ भारतीयांना परत आणण्यात दर्यापूरच्या लेकीचा सहभाग

याप्रकरणी खुशी आणि खुशाल हे दोघे कधी काळी विवाह बंधनात होते. त्यामुळे तेव्हा त्यांच्यात घरगुती संबंध होते, असा दावा ही महिला करू शकली असती. मात्र, घटस्फोट झाल्यानंतर हा मुद्दा उपस्थित करून खुशाल आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध घरगुती हिंसाचाराची कारवाई करणे अयोग्य ठरेल. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध सुरू करण्यात आलेली कौटुंबिक हिंसाचाराची प्रक्रिया थांबविण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com