
फिडे महिला बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धा जिंकलेल्या ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचं बुधवारी रात्री जल्लोषात नागपूरमध्ये स्वागत करण्यात आलं. जॉर्जियातल्या बाटुमी इथं दिव्याची अंतिम लढत भारताच्याच कोनेरू हम्पीसोबत होती. कोनेरू हम्पीला पराभूत करून दिव्यानं स्पर्धा जिंकली. या स्पर्धेनंतर दिव्या देशमुख बुधवारी नागपूर विमानतळावर दाखल झाली. यावेळी तिनं एक फोटो हातात घेतल्याचा फोटो सध्या व्हायरल होतोय. तिचे पहिले गुरु राहुल जोशी यांचा तो फोटो आहे.