Diwali Flight Fares to Nagpur Surge, with Mumbai–Nagpur Tickets Reaching ₹22,800
esakal
नागपूर: दिवाळीच्या काळात प्रमुख शहरांमधून नागपूरकडे येणाऱ्या विमान तिकिटांचे दर १२ ते २२ हजार रुपयांपर्यंत कडाडले आहे. विशेषतः मुंबई-नागपूर मार्गावर तो दर तब्बल २२ हजार ८०० रुपयांवर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
दिवाळीत गावी परतणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांच्या खिशाला यंदा मोठा फटका बसणार आहे. सणासुदीच्या हंगामात रेल्वेचे आरक्षण फुल झाल्यामुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिप्पट ते दुपटीहून अधिक भाडे मोजावे लागत आहे.