Diwali Shopping : सतर्कता न बाळगल्यास दिवाळे

दिवाळीत आॅनलाईन खरेदी करताना जाणून घ्या हक्क
online shopping
online shopping

नागपूर : दसरा आणि दिवाळीच्या काळात ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांनी सतर्कता बाळगायला हवी. अन्यथा ऐन दिवाळीतच आपले दिवाळे निघू शकते. ऑनलाइन खरेदीची सध्या सर्वांनाच भुरळ पडली आहे. मोबाइलमधील विविध शॉपिंगचे अॅप्स ऑनलाइन खरेदीचे पर्याय खुले करत आहेत. मात्र, अशी खरेदी करताना ग्राहकांनी आपले हक्क जाणून घेत अधिक सजग राहणे आवश्यक आहे.

ऑनलाइन खरेदीत काय कराल?

  • ऑनलाइन शॉपिंगच्या मायाजालाचा मोह आता सर्वांनाच पडतो आहे. दिवाळी आता काही दिवसांवर आल्यामुळे ऑनलाइन कंपन्यांकडून ऑफर्सचा धमाका सुरू आहे. ऑनलाइन खरेदी करताना काही काळजी घेतल्यास ऑनलाइन शॉपिंगही हॅपी शॉपिंग होऊ शकते.

  • ज्या वेबसाइटवरून आपण आवडती वस्तू खरेदी करणार आहात, त्या वेबसाइटच्या सर्वांत खालच्या ठिकाणी ‘वेरी साइन ट्रस्डेट’ अशा पद्धतीचे सर्टिफिकेट दिलेले आहे किंवा नाही, हे आधी तपासून पहा.

  • या वेबसाइट ई-कॉमर्सच्या नियमानुसार सुरू केल्या आहेत किंवा नाहीत, हे आधी तपासणे आवश्यक आहे. या वेबसाईट अधिकृत आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घ्यावी. त्यासाठी संबंधित कंपनीच्या कॉलसेंटरवर फोन करून माहिती घेता येते.

  • संबंधित वेबसाइटवरून खरेदी केलेल्या इतर ग्राहकांनी त्यांना आलेले अनुभव जे काही चांगले किंवा वाईट आहेत, त्याची माहिती दिलेली असते. ग्राहकांनी दिलेले ‘रिमार्क’ वाचून आपण खरेदी करण्यापूर्वी योग्य निर्णय घेऊ शकतो.

  • कंपनीची किंवा वेबसाइटची सत्यता तपासून पाहावी.

  • खरेदीनंतर आर्थिक तपशील भरताना काळजी घ्यावी. आपल्या बँकेची खरी वेबसाइट लिंक दिलेली असेल तरच त्याचे तपशील भरावेत.

  • शक्यतो ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चा पर्यायच निवडावा. त्यामुळे, खरेदी करताना काही चूक झाल्यास आपण दिलेल्या रकमेचा घोळ होत नाही.

  • मागविण्यात आलेले पार्सल उघडताना त्याचा व्हिडीओ तयार करा. पार्सल उघडताना त्यात असलेल्या वस्तू डॅमेज असतील, तर ते व्हिडीओमध्ये रेकॉर्ड होईल.

  • आपल्या बँकेशिवाय आणि ऑनलाइन खरेदी कंपनीशिवाय इतर कोणत्याही मध्यस्थ ऑनलाइन वेबसाइटवरून आर्थिक व्यवहार करू नयेत.

  • खरेदी केलेली वस्तू किंवा पैसे परत घेत असतील किंवा वस्तू बदलून मिळत असतील तरच ऑनलाइन खरेदी करा.

दुकानात खरेदी करतानाचे हक्क

  • दुकानात येऊन वेगवेगळे प्रॉडक्ट पाहणे आणि काहीच खरेदी न करता निघून जाणे

  • बार्गेनिंग करणे

  • व्यवहार करताना पैसा वाचवण्याचा दृष्टिकोन बाळगणे

  • प्रॉडक्टमधे चूक आढळल्यास, खराब सर्व्हिस मिळाल्यास आपल्यावर चिडणे, रागावण्याचा विक्रेत्याला हक्क नाही

  • अगदी ग्राहक म्हणून थोड्याशा गुर्मीत बोलणे

  • व्यवहार ठरलेल्या वेळेत आणि ठरलेल्या पैशातच पूर्ण करून मिळणे

  • हव्या त्या व्यावसायिकाकडे खरेदी करणे

  • वस्तू सांगितल्या प्रमाणेच, निश्चित केलेल्या गुणवत्तेचीच मिळणे

  • व्यावसायिकाकडून सन्मानाची वागणूक मिळणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com