esakal | महिलादिनीच संतापजनक प्रकार!  नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरनं केला नर्सवर बलात्कार  

बोलून बातमी शोधा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३५ वर्षाची नर्स गेल्या काही वर्षांपासून शंकरनगरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३५ वर्षाची नर्स गेल्या काही वर्षांपासून शंकरनगरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये कार्यरत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३५ वर्षाची नर्स गेल्या काही वर्षांपासून शंकरनगरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे.

महिलादिनीच संतापजनक प्रकार!  नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरनं केला नर्सवर बलात्कार  
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः अंबाझरी रोडवरील एका नामांकित बहुमजली हॉस्पिटलमधील डॉक्टरने विवाहित स्टाफनर्सवर हॉस्पिटलमध्येच बलात्कार केला. तिचे अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी डॉक्टरला अटक केली. अमरदीप क्रीष्णाजी मंडपे असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३५ वर्षाची नर्स गेल्या काही वर्षांपासून शंकरनगरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. आरोपी डॉक्टर अमरदीप मंडपेसुद्धा तेथे ऑपरेशन थेटरमध्ये कार्यरत आहे. अमर विवाहित असून त्याला पत्नी व दोन मुले आहेत. तर नर्सला एक मुलगी आणि पती नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतो. 

हेही वाचा - नागरिकांनो सावधान! हवामान खात्यानं दिला धोक्याचा इशारा; प्रचंड तापमानवाढीचे संकेत

सोबत काम करीत असताना दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दोघेही एकमेकांच्या जास्त संपर्कात राहायला लागले. ऑक्टोबर २०२० मध्ये हॉस्पिटलच्या सहाव्या माळ्यावर नेले. तेथे तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिला. मात्र, अमरने तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी त्याने मोबाईलने शारीरिक संबंधाचे शूटिंग केले तसेच तिचे नग्न फोटोसुद्धा काढले. 

प्रेम करण्याचे आमिष दाखवून तो गेल्या वर्षभरापासून नर्सशी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. तिने नकार दिल्यास तो लगेच हॉस्पिटलच्या वॉट्सॲप ग्रूपवर नग्न फोटो आणि व्हिडिओ टाकण्याची धमकी देत होता. त्यामुळे अमरच्या वासनेची ती बळी ठरत होती. त्याच्या नेहमीच्या त्रासाला ती कंटाळली होती.

आता नको बस्स...!

नर्सचा पती बाहेरगावी राहत असल्याची संधी साधून अमरने तिच्याशी जवळिक साधली. त्यात तो यशस्वीसुद्धा झाला. परंतु तो केव्हाही नर्सला शारीरिक संबंधासाठी सक्ती करीत होता. त्या प्रकाराला नर्स त्रस्त झाली होती. त्यामुळे तिने हे नाते थांबविण्यासाठी अमरशी चर्चा केली. मात्र त्याने नग्न व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली.

हेही वाचा - प्रेम एकीवर अन् साखरपुडा दुसरीशी; विवाहित प्रेयसीवर बलात्कार तर होणाऱ्या पत्नीला दिला दगा

नोकरी गेली-गुन्हा दाखल

अमरदीप मंडपेच्या जाचाला बळी पडलेल्या नर्सने बजाजनगर पोलिस स्टेशन गाठले. तिने अमरची चॅटिंग आणि मॅसेज पोलिसांना दाखवले. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याला अटक केली. हॉस्पिटल प्रशासनाने त्याला नोकरीवरून काढून टाकले. 

संपादन - अथर्व महांकाळ