‘मला कोणताच डॉक्टर बरा करू शकत नाही’

संसार तुटल्यामुळे ती नैराश्‍यात गेली होती
crime
crimecrime

नागपूर : घटस्फोट झाल्यानंतर एकाकी जीवन जगत असलेल्या महिला डॉक्टरने स्वतःला विषाची चार इंजेक्शन (Injection of poison) टोचून आत्महत्या (Doctors suicide) केली. ही दुर्दैवी घटना जरीपटक्यात उघडकीस आली. आकांक्षा अमृत मेश्राम (वय ३४, रा. नागसेननगर, जरीपटका) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा मेश्राम हिचे वडील शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त झाले आहे. तर भाऊ बंगळुरूमध्ये नोकरी करतो. आई एलआयसी विभागात नोकरीवर आहे. उच्चशिक्षित असलेल्या मेश्राम कुटुंबातील मोठी मुलगी आकांक्षी हिने परिश्रम घेऊन एमबीबीएस आणि एमडीचे शिक्षण पूर्ण केले.

crime
दारूवरील उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात; नवे दर जाहीर

सोलापुरातील शासकीय रुग्णालयात ती नोकरीवर होती. तिने कुटुंबीयांच्या संमतीने लग्न केले. परंतु, काही वर्षांनंतर संसारात कटुता आल्याने दोघांच्याही सहमतीने घटस्फोट घेऊन वेगळे राहू लागले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आकांक्षा सोलापुरातून नागपुरात राहायला आली. वडिलांच्या घरी पहिल्या माळ्यावर ती राहत होती.

संसार तुटल्यामुळे ती नैराश्‍यात गेली होती. काही दिवसांपासून ती तणावात राहू लागली होती. शनिवारी पहाटेच्या सुमारास तिने विषारी औषध भरलेले चार इंजेक्शन स्वतःला टोचले आणि आत्महत्या केली. जरीपटक्याचे ठाणेदार वैभव जाधव यांनी घटनास्थळ गाठून स्वतः शहानिशा केली आणि आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

crime
उमेदवार बदलल्याने काँग्रेसचे तीन नेते आले अडचणीत!

सकाळी उघडकीस आली घटना

शनिवारी सकाळी नऊ वाजले तरी मुलगी आकांक्षा चहा घ्यायला खाली न आल्याने आई वरच्या माळ्यावर गेली. तिने दरवाजा ढकलला असता मुलगी बेडवर पडलेली दिसली आणि चार रिकामे इंजेक्शन दिसले. बाजूलाच सुसाईड नोट दिसली. ‘मला आता कोणताच डॉक्टर बरा करू शकत नाही. मी स्वेच्छेने आत्महत्या करीत आहे. आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नका’ असा उल्लेख चिठ्ठीत असल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com