नागपूर - घरगुती वादातून पतीने कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा खून केला. ही घटना शुक्रवारी (ता. ११) सकाळी मानकापूर परिसरातील लोखंडे ले-आऊटमध्ये घडली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली..सविता शिवकुमार वरखडे (वय-२६, रा. लोखंडे ले-आऊट, मानकापूर) असे मृत पत्नीचे, तर शिवकुमार रमेश वरखडे (वय-३०) असे अटकेतील आरोपी पतीचे नाव आहे. तो मजुरीचे काम करतो. पत्नीही मजुरी आणि धुणीभांडी करायची. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला..शिवकुमारने संतापाच्या भरात सविता यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीचे घाव घातले. त्यामुळे सविता गंभीर जखमी होऊन घरातच कोसळल्या. घटनेची माहिती मिळताच शेजारील नातेवाइकांनी सविता यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले..घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून प्राथमिक माहिती घेतली. परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्तांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.