नागपूर : शाळा सुरू करण्याची घाई नको; पालकांचे मत

एक महिना पुढे नेण्याची मागणी
School
Schoolsakal

नागपूर : दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाचा ‘ओमीक्रॉन’ हा नवा व्हेरिएंट जगभर वेगाने पसरत असून, राज्य आणि केंद्र सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले असून येत्या १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याची घाई नको असे मत पालकांनी व्यक्त केले आहे.

कोरोनामुळे गेल्या मार्चपासून शाळा बंद आहेत. कोरोनाची लाट ओसरल्याने प्रथम ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथी आणि शहरी भागात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात येणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून ‘ओमीक्रॉन’ या नव्या व्हेरिएंटने संक्रमित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे वृत्त पसरले आहे. त्याचा प्रादुर्भाव इतरही देशात होत असल्याच्या बातम्या येत आहे. राज्य सरकारने १ डिसेंबरपासून ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथी आणि शहरी भागात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. लहान मुलांचे आरोग्य महत्त्वाचे म्हणून पालकांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबवावा असे मत व्यक्त केले आहे.

School
भिवंडीत लग्नमंडपात फटाके फोडणे भोवले; आग लागल्याने २५ दुचाकी खाक

"शाळा सुरू व्हाव्यात असे पालकांना वाटते कारण मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. पण जिवापेक्षा शाळा महत्त्वाची नाही. जोपर्यंत मुलांचे लसीकरण होत नाही तोपर्यंत शाळा सुरू होऊ नयेत."

- सुवर्णा कडू, पालक

"दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने मुलांचा शैक्षणिक विकास खुंटला आहे. त्यामुळे शाळा सुरू करणे गरजेचे आहे. मात्र, त्या सुरू करताना कोरोनाचे नियम पाळूनच सुरू कराव्यात. नियमावलीनुसार ५० टक्केच उपस्थिती असल्याने ज्यांना विद्यार्थ्यांना पाठवायचे नसल्यास ते ऑनलाइन शिक्षण घेऊ शकतात."

- डॉ. तेजश्री दातारकर (माथनकर)

"कोरोनाचा नव्या व्हेरिएंटमुळे पालकांमध्ये भीती वाढत आहे. याबाबत सरकार स्तरावरही उपाययोजना करण्यात येत असल्याने खबरदारी म्हणून सरकारने अद्याप शाळा सुरू करू नये. शाळांबाबत घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा."

- रश्‍मी ठवकर, पालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com