Nagpur News : समीर जोशी यांना अखेर साडेनऊ वर्षानंतर जामीन

सूर्या कंपनीचे मालक समीर जोशी यांना अखेर साडेनऊ वर्षानंतर जामीन मिळाला आहे.
double investmement fraud case sameer joshi Bail granted nagpur
double investmement fraud case sameer joshi Bail granted nagpuresakal

नागपूर : दामदुप्पट नफ्याचे आमिष दाखवून शहर तसेच विदर्भातील शेकडो लोकांना गंडविल्याचा आरोप असलेले श्री सूर्या कंपनीचे मालक समीर जोशी यांना अखेर साडेनऊ वर्षानंतर जामीन मिळाला आहे.

त्याच्यावर दाखल असलेल्या सर्वच प्रकरणांमधून त्यांना जामीन मिळाला आहे. लवकरच ते कारागृहातून बाहेर येतील अशी माहिती प्राप्त झाली आहे. श्री सूर्या कंपनीचे संचालक म्हणून त्यांनी अनेकांना दामदुप्पट नफ्याचे आमिष दाखविले. त्याबदल्यात त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

या आरोपांखाली त्याच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांमध्ये २०१३ मध्ये त्यांना अटक करण्यात आली. या घोटाळ्यानंतर शहरातील या प्रकारचे अनेक घोटाळे समोर आले. यातील सर्वच आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पुढे सगळ्यांचीच जामिनावर सुटकाही झाली. समीर जोशींच्या पत्नीचीही जामिनावर सुटका झाली होती. मात्र, जोशींना जामीन मिळालेला नव्हता. अखेर. तब्बल साडे नऊ वर्षांनंतर त्यांना जामीन मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com