Nagpur News : बाबासाहेबांच्या वापरातील वस्तू पाच वर्षांपासून कुलूपबंद

धम्मक्रांतीच्या शहर सीमेवर उभ्या असलेल्या शांतिवनात बाबासाहेबांच्या दैनंदिन वापरातील वस्तू दर्शनासाठी ठेवल्या आहेत.
Shantivan Museum
Shantivan Museumsakal

नागपूर - धम्मक्रांतीच्या शहर सीमेवर उभ्या असलेल्या शांतिवनात बाबासाहेबांच्या दैनंदिन वापरातील वस्तू दर्शनासाठी ठेवल्या आहेत. या वस्तूंचे दर्शन घेतले की, डोळ्यासमोर येते बाबासाहेबांचे उत्तुंग कार्य आणि धम्मदीक्षा सोहळा. शांतिवनातील संग्रहालयात बाबासाहेबांच्या दैनंदिन व्यवहारातील १०८० वस्तू रासायनिक प्रक्रिया करून ठेवण्यात आल्या आहेत.

मात्र म्युझियममध्ये बाबासाहेबांची मूर्ती व अंतर्गत सजावट न झाल्यामुळे सर्व वस्तू मागील पाच वर्षांपासून कुलूपबंद आहेत. परिणामी हे संग्रहालय ओस पडले असून शासनदरबारी २९ कोटींचा प्रस्ताव धूळखात पडला आहे.

दीक्षाभूमीपासून १५ किमी अंतरावरील चिचोली येथील शांतिवनात बाबासाहेबांच्या दैनंदिन वापरातील वस्तूचे दर्शन घेतले की, नवी उर्जा मिळते. अस्पृश्‍यांच्या आयुष्यातील काळोख दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी ज्या कंदिलाच्या प्रकाशनात अभ्यास केला, तो कंदील येथे आहे. बाबासाहेबांच्या हातून ‘बुद्ध ॲण्ड हिज धम्म’ आणि संविधानाची निर्मिती होत असताना ज्या ‘टाइपरायटर’चा उपयोग त्यांनी केला त्याला गंज लागला होता.

कंदील निकामी होण्याच्या मार्गावर होता. बाबासाहेबांचे सातशेवर कपडे आहेत. ते खराब होण्याच्या मार्गावर होते. त्यांच्या वस्तूंमधून सदैव प्रेरणा मिळत राहावी यासाठी रासायनिक प्रक्रिया करण्यात आली.

पाच वर्षांपासून संग्रहालय बंदच असल्याने त्या वस्तूंही प्रेक्षकांची वाट पाहत आहेत. धम्मदीक्षा सोहळ्यातील धम्मसेनानी वामनराव गोडबोले आयुष्यभर झटून शांतीवन उभारले. त्या शांतिवनाच्या संवर्धनासाठी समितीचे शांतीवनचे कार्यवाह संजय पाटील, शेखर गोडबोले प्रयत्नशील आहेत.

४० कोटीतून उभारल्या केवळ वास्तू

शांतिवन येथे बाबासाहेबांचे स्मृती सामाजिक व सांस्कृतिक प्रशिक्षण केंद्र आहे. वैयक्तिक वापराच्या वस्तू व साहित्य आहे. या वस्तूंचे जतन, संरक्षणव संवर्धन करणे, संग्रहालयाचे आधुनिकीकरण व परिसराचे सुशोभिकरण यांसाठी ४० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. नऊ वास्तू उभारल्या.

यात गेस्ट हाऊस, सभागृह, संग्रहालय, वसतिगृह, आनापानासथी इमारत, उपासक गृह, मेडिटेशन हॉल, टीचर्स कॉटेज आदींचा समावेश आहे. या निधीतून परिसरात केवळ वास्तूच उभ्या आहेत. आतील फनिंचर व इतर बाबींची व्यवस्थाच नाही. त्यामुळे सर्व वस्तू प्रक्रियेनंतरही कपाटातच आहेत.

दुसऱ्या टप्प्यात शांतिवनाचे आधुनिकीकरण प्रस्तावित आहे. त्यासाठी १७४.९९ कोटींचा आराखडा करण्यास सांगितले होते. शासनाकडे आराखडा शासन मान्यतेसाठी पाठविण्यात आला. या निधीतून सर्व कामे होतील, असे सांगण्यात आले. परंतु, एवढा निधी देणे शक्य नाही, असे एनएमआरडीतफे स्पष्ट केले. केवळ २९ कोटींचा प्रकल्प तयार करा, असे आदेश दिले. त्यानुसार तो तयार केला, परंतु तो प्रस्ताव मंजूर होत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.

- संजय पाटील, कार्यवाह, शांतीवन-चिचोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com