७० वर्षांच वैभव नरेंद्र मोदी विकत असल्याचा डॉ. राऊत यांचा घणाघात

७० वर्षांच वैभव नरेंद्र मोदी विकत असल्याचा डॉ. राऊत यांचा घणाघात
Updated on: 

नागपूर : सात वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सत्तेत असून हीच बाब देशाच्या दृष्टीने घातक ठरली. उद्योग, कृषी, शिक्षण, रोजगार, महागाई, जीडीपी, आंतरराष्ट्रीय संबंध, निर्यात अशा सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी (Modi government fails on all fronts) ठरले, अशी टीका राज्याचे ऊर्जामंत्री व पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (State Energy Minister and Guardian Minister Dr. Nitin Raut) यांनी केली. (Dr. Nitin Raut said, Modi government fails on all fronts)

मोदी सरकारच्या एकूणच कारभाराचा काँग्रेसतर्फे रविवारी जाहीर निषेध करण्यात आला. यानिमित्त आयोजित पत्रकारपरिषदेत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीकास्त्र सोडले. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू ते डॉ. मनमोहन सिंह यांच्यापर्यंत काँग्रेस सरकारने ७० वर्षांत विकासातून देश उभा केला. आज हेच वैभव नरेंद्र मोदी विकत असल्याचा घणाघात डॉ. राऊत यांनी केला.

७० वर्षांच वैभव नरेंद्र मोदी विकत असल्याचा डॉ. राऊत यांचा घणाघात
मंत्रालयात बॉम्ब असल्याचा कॉल आणि नागपुरात धडपड; प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

सत्तेवर येताच १०० दिवसांत महागाई कमी करू असा ढोल बडवणाऱ्यांनी पेट्रोल १०० रुपये लीटर, डिझेल ९० रुपये लीटर व एलपीजी गॅस ९०० रुपये केले. खाद्यतेल १८० ते २०० रुपये लीटर केले. गरीब, सर्वसामान्य, नोकरदार तसेच मध्यमवर्गांचेही जगणे अवघड करून टाकले आहे. संविधानाला न जुमानणारे मोदी सरकार सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग, न्यायालये या सर्व स्वायत्त संस्थांमध्ये हस्तक्षेप करून लोकशाही मूल्याची तत्त्वे पायदळी तुडवत आहेत. विरोधी पक्षांच्या सरकारची अडवणूक केली जात आहे, असेही डॉ. राऊत म्हणाले.

यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, ग्रामीण कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनीही मोदी सरकारच्या कारभाराचा निषेध केला. पत्रकार परिषदेला आमदार अ‍ॅड. अभिजित वंजारी, आमदार राजू पारवे, सुरेश भोयर, नाना गावंडे, अनिल नगरारे यांच्यासह आदी उपस्थित होते.

७० वर्षांच वैभव नरेंद्र मोदी विकत असल्याचा डॉ. राऊत यांचा घणाघात
दोन शेतकऱ्यांची आत्महत्या; पेरणीची सोय नसल्याने मृत्यूला केले जवळ

जबाबदारी राज्यांवर ढकलण्याचे काम

काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले. नोटाबंदीसारखा अविचारी निर्णय घेऊन देशाला रांगेत उभे केले. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले. मनमानी व लहरी पद्धतीने, कसलेही नियोजन न करता देश लॉकडाउन केला. लसीकरणाचे कोणतेही धोरण आखलेले नाही. सर्व अधिकार केंद्राकडे ठेवून जबाबदारी मात्र राज्य सरकारवर ढकलायची हेच केंद्र सरकारचे धोरण असल्याचाही आरोप डॉ. राऊत यांनी केला.

(Dr. Nitin Raut said, Modi government fails on all fronts)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com