
नागपूर : आंतरराष्ट्रीय जलतरणपटू असलेल्या नागपूरच्या ६७ वर्षीय डॉ. राजश्री जैन यांनी सर्वाधिक भारतीय तिकिटांच्या (इंडियन स्टॅम्पस) ‘फर्स्ट डे कव्हर्स’चा संग्रह केला आहे. या अनोख्या संग्रहाची प्रतिष्ठेच्या ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने दखल घेतली असून, २०२५ च्या एडिशनमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला आहे. राजश्री यांच्यासह नागपूरकरांसाठी ही आनंद व अभिमानाची बाब आहे.